महाराष्ट्र मुंबई

“मुंबई महापालिकेवरील भगवा उतरवण्याची अवदसा आठवली असेल तर…”

मुंबई | मुंबई महापालिकेवरील भगवा उतरवण्याची अवदसा आठवली असेल तर त्या अवदसेचे थडगे मुंबईची तमाम जनता बांधून त्यावरही भगवा फडकवेल, असं म्हणत शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.

मुंबई म्हणजे सदैव उसळणारा अग्नी आहे. या अग्नीचा रंग भगवा आहे. भगवा शुद्धच आहे. भगव्याला हात लावाल तर जळून खाक व्हाल, असा इशारा शिवसेनेने भाजपला दिला आहे.

मुंबई महानगरपालिकेवर शुद्ध भगवा फडकवायचा. आता हा शुद्ध भगवा म्हणजे नक्की काय प्रकार आहे? बेशुद्ध अवस्थेत केलेलं हे वक्तव्य आहे, अशी टीका शिवसेनेनं देवेंद्र फडणवीसांवर केली आहे.

भाजप शिवसेनेसोबत नव्हता तेव्हापासून मुंबईवर भगवा फडकलेलाच आहे. हा भगवा शुद्ध, तेजस्वी आणि प्रभावी आहे. यापेक्षा वेगळा भगवा अस्तित्वात आहे असे महाराष्ट्राला वाटत नाही. हा भगवा छत्रपती शिवरायांचाच आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

वीजबिल माफीसाठी सलून व्यावसायिक आक्रमक, सरकारविरोधात राज्यभर आंदोलन करणार

‘भाजप हवेत चालणारा पक्ष असेल तर राष्ट्रवादी…’; चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला टोला

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पुन्हा एकदा एअर स्ट्राईक; दहशतवाद्यांचे अनेक बंकर्स उद्ध्वस्त

सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागं करण्यासाठी राज्यात वीजबिलांच्या होळीचं आंदोलन करणार- चंद्रकांत पाटील

“शेतकऱ्यांनी थकबाकी भरल्यास 50 टक्के वीजबिल माफी मिळणार”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या