महाराष्ट्र मुंबई

“राहुल गांधींचं ते वक्तव्य बकवास वाटत असेल तर मोदींची आधीची वक्तव्य तपासा”

मुंबई | चिन्यांना पंधरा मिनिटांत बाहेर काढू असं राहुल गांधींचं म्हणणं कुणाला ‘बकवास’ वाटत असेल तर त्यांनी पंतप्रधान मोदींची अशा प्रकारची वक्तव्ये तपासून घ्यायला हवीत, असा टोला शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाजपला लगावला आहे.

जे सरकार देशांतर्गत राजकीय विरोधकांवर सायबर हल्ले करु शकते, त्यांना चीनशी लढणे कठीण नाही. 80 हजार फेक अकाऊंटस्च्या माध्यमातून लढलेल्या सायबर युद्धात शेवटी पराभवच पत्करावा लागला, पण लडाखच्या सीमेवर आणि कश्मीर खोऱ्यात आपल्याला जिंकावंच लागेल, असं शिवसेनेनं म्हटलंय.

राहुल गांधींनी पंधरा मिनिटांत चिन्यांना मागे हटवण्याचे आव्हान स्वीकारले आहे. त्यांच्याकडे त्याबाबत कोणती योजना आहे? त्यावरही पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधींशी बोलायला हवं, असं शिवसेनेनं म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

‘हाथरस प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष, त्यांची तात्काळ मुक्तता करा’; ‘या’ भाजप नेत्याची मागणी

आयपीएल वर सट्टा लावणारी टोळी गजाआड; 11 जणांना रायगडमध्ये केली अटक

…तर सर्व पुरस्कार परत करेन, हे क्षत्रियाचं वचन आहे- कंगणा राणावत

‘मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी द्या’; हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या