बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महामारीचे बाप बनून लोकांच्या जिवाशी का खेळता?”

मुंबई | जग दुसऱ्या महायुद्धानंतरच्या सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. एकत्र येऊन त्या संकटाशी सामना करावा लागेल. परंतु राज्यातील भाजप सरकार तसे करत नसल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.

कोरोना हे दुसरे विश्वयुद्ध आहे. याचा अर्थ समजून घ्या. हे विश्वयुद्ध ज्यांनी लादले व नरसंहार घडविला ते हिटलर, मुसोलिनी वगैरे नेत्यांचे पुढे जनतेने काय हाल केले ते महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनी समजून घ्यावं, असं शिवसेनेनं म्हटलंय.

पंतप्रधान मोदी यांनी गर्दीचे प्रसंग टाळा. सोशल डिस्टन्सिंगचे भान राखा, असे आवाहन वारंवार केले आहे. पण पं. बंगाल व महाराष्ट्राच्या बाबतीत पंतप्रधान मोदींचे ऐकायचेच नाही असा विडा उचलून भाजपाई रस्त्यावर उतरत आहेत. या अतिरेकी वागण्यांमुळे आपण ‘कोरोना’चा प्रसार वाढवीत आहोत व लोकांच्या जिवाशी खेळत आहोत, अशी टीका शिवसेनंन केलीये.

कोरोनाला मुके देत व मुके घेत या मंडळींनी जो शिमगा केला तो विरोधी पक्षाचा सरकारविरोधी कार्यक्रम अमानुषतेचे लक्षण आहे, असं शिवसेनेनं म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

आम्हाला चंपा, टरबुजा बोललेलं कसं चालतं?- चंद्रकांत पाटील

शहीद मेजर कौस्तुभ राणेंच्या पत्नी कनिका सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू

“देवेंद्र फडणवीसांना शिवसेनेवर टीका करण्याशिवाय पर्याय नाही”

‘मी सगळं सुरू करतो, काही झालं तर त्याची जबाबदारी घेता का?’; उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सुनावलं

करायचं ठरवलं की महाराष्ट्र करुन दाखवल्याशिवाय राहत नाही- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More