बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चार कोंबड्या, दोन कावळे मेले तरी केंद्र सरकार महाराष्ट्रात सीबीआय आणि एनआयएला पाठवेल”

मुंबई | परमीबर सिंह यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या गंभीर आरोपांनंतर विरोधकांनी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी करत ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. यावरून शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून राज्यातील भाजप नेते आणि केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

सरकारला फक्त बदनामच करायचे असे नाही, तर सरकारला अडचणीत आणायचे असे त्यांचे धोरण आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन मोदी-शहांना भेटतात व दोन दिवसांत परमबीर सिंग हे असे पत्र लिहून खळबळ माजवतात. त्या पत्राचा आधार घेऊन विरोधी पक्ष जो हंगामा करीत आहे हा एक कटाचाच भाग दिसतो, असा आरोप शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.

विरोधी पक्षाने केंद्रीय तपास यंत्रणांचा अतिरेकी वापर महाराष्ट्रात चालवला आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यास हे परवडणारे नाही. एका बाजूला राज्यपाल राजभवनात बसून वेगळेच उपद्व्याप करीत आहेत तर दुसऱ्या बाजूला केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबावाचा खेळ करीत आहे, असं म्हणत शिवसेनेनं केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

एखाद्या भागात चार कोंबड्या व दोन कावळे विजेच्या तारांचा शॉक लागून मेले तरी केंद्र सरकार महाराष्ट्रात सीबीआय किंवा एनआयएला पाठवू शकेल असे एकंदरीत दिसतं, असा टोला शिवसेनेनं अग्रलेखातून केंद्र सरकारला लगावला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“बहुमतावर कुरघोडी कराल तर आग लागेल, हा इशारा नसून वस्तुस्थिती”

“आजचे हे अधिकारी अर्धी चड्डीच्या इशाऱ्यावर चाल सिंहाची दाखवतात, अन्…”

“जास्त धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुलं जन्माला का घालत नाही?”

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर जयंत पाटील म्हणाले…

‘100 कोटीच्या हिस्सेदारांची नुसती धावपळ चालली आहे’; ‘या’ भाजप नेत्याचं मोठं विधान

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More