महाराष्ट्र मुंबई

“जीडीपी 10 % वाढेल, हा अंदाज हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे ठरू नये”

मुंबई | आगामी वर्षात देशाच्या जीडीपीमध्ये वाढ होऊन तो दुहेरी आकडा गाठेल, असा अंदाज केंद्राने वर्तवला आहे. यावरून शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारला टोला लगावला आहे.

सद्यपरिस्थिती पाहता केंद्राने वर्तवललेला अंदाज हा हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे ठरू नये, असा खोचक टोला शिवसेनेनं केंद्र सरकारला लगावलाय.

आपल्या अर्थव्यवस्थेच्या अधोगतीला कोरोना हे एक कारण नक्कीच आहे, पण अर्थव्यवस्थेची सध्याची दुरवस्था हा केंद्रातील राज्यकर्त्यांच्या मागील सहा वर्षांतील आर्थिक धोरणांचाही परिपाक आहे. म्हणूनच पुढील वर्षी उणेचा खड्डा भरून काढत जीडीपी 10 टक्के वाढीची झेप घेणार या अंदाजाबाबत जनतेच्या मनात संभ्रम असू शकतो. ही वाढ झाली तर ते चांगलंच आहे, असं अग्रलेखात म्हटलंय.

केंद्रीय अर्थमंत्री यंदाचा अर्थसंकल्प न भूतो न भविष्यती असेल असं सांगत असल्या तरी केंद्र सरकारची आर्थिक कोंडी झाली आहे, हेदेखील तितकंच खरं आहे. अशा वेळी दहा टक्के वाढीची पिपाणी वाजवून केंद्र सरकारने जिंकल्याचा आव आणू नये इतकेच, अशी टीकाही शिवसेनेनं अग्रलेखातून केली.

थोडक्यात बातम्या-

भाजप कार्यकर्त्यांवर पुन्हा हल्ला; व्हीडिओ शेअर करत कैलास विजयवर्गीय यांनी मततादीदींना सुनावलं

‘आता लव्ह लेटर पाठवू नका’; शेतकऱ्यांनी मोदी सरकारला सुनावलं

पंकजा मुंडेंच्या ताब्यातील वैद्यनाथ साखर कारखान्यात चोरी; ‘इतक्या’ लाखांचं साहित्य लंपास

नाशिकमध्ये कोरोनामुळे 3 महिन्याच्या बाळाचा मृत्यू!

“कोरोनाचा नवा अवतार अधिक संसर्गजन्य, आता जास्त काळजी घ्यावी लागेल”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या