बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आगीत तेल ओतण्याचे धंदे बंद करा, तेल स्वस्त झालंय का?”

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 14 मार्चला होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात विद्यार्थी आक्रमक झाले होते. गुरुवारी पुण्याच्या नवी पेठ परिसरात या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनात आमदार गोपीचंद पडळकर देखील सहभागी झाले होते. यावरून सामनाच्या अग्रेलाखातून शिवसेनेनं गोपीचंद पडळकरांवर निशाणा साधला आहे.

विरोधकांनो, आगीत तेल ओतण्याचे धंदे बंद करा; तेल स्वस्त झालंय का?, असं म्हणत शिवसेनेनं पडळकरांवर टीकास्त्र सोडलं आहे. एका बाजूला कोरोना वाढतोय म्हणून सरकारला दोष द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला कोरोना रोखण्यासाठी सरकारने कडक पावले उचलली तर सरकारचे पाय ओढायचे असं विरोधी पक्षाचं चाललं आहे. एमपीएससी परीक्षेबाबतही त्यांचे धोरण दुटप्पीच आहे, अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

पेट्रोल, डिझेलचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत, पण विरोधी पक्षासाठी ते स्वस्त झाले आहेत काय? विरोधी पक्षहो, आगीत तेल ओतण्यासाठी तुम्हाला कोणी स्वस्त भावात तेलपुरवठा करत आहे काय?, असा सवाल शिवसेनेनं अग्रलेखातून भाजपला केला आहे.

देशातील वाढत्या बेरोजगारीचे मूळ केंद्र सरकारच्या बिनडोक आर्थिक धोरणात आहे. विरोधी पक्षाने जहाल व्हायला हवे ते बेरोजगारीच्या मुद्द्यावर, पण महाराष्ट्रातील विरोधी पक्ष विद्यार्थ्यांना जमवून भिकार राजकारण करीत आहे व विद्यार्थ्यांची माथी भडकवून त्यांना सरकारविरुद्ध लढायला भाग पाडत आहे. विद्यार्थी आणि पोलिसांत झगडा लावायचा व आपण मजा बघायची अशी मानसिकता यात दिसते, अशा शब्दांत शिवसेनेने अग्रलेखातून भाजपवर सडकून टीका केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“लॉकडाऊनपेक्षा मृत्यूदर कसा कमी करता येईल याचं नियोजन करा”

“नरेंद्र मोदी भगवान शंकराचा अवतार आहेत, त्यांनीच देशाला कोरोनापासून वाचवलं”

राज्यात कोरोनाचा उद्रेक; आजची आकडेवारीही अत्यंत धक्कादायक

’21 तारखेला जर परीक्षा झाली नाही तर…’; गोपीचंद पडळकरांंचा राज्य सरकारला इशारा

“राज्याचा अर्थसंकल्प फक्त पुण्याभोवती केंद्रीत, महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More