“जनताही वेळ येताच सगळा हिशेब चुकता करत असते हे कोणी विसरू नये”
मुंबई | शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून इंधन दरवाढीवरून केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. जनतेला काही पैशांचा दिलासा देण्यापेक्षा वर्षभरात पेट्रोल-डिझेलच्या प्रचंड दरवाढीतून केंद्र सरकारला जी ‘वरकमाई’ झाली आहे, त्यातील काही हिस्सा जनतेला द्या, असं म्हणत शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
गेल्या वर्षभरापासून वाढतच असलेले पेट्रोल-डिझेलचे दर बुधवारी आणि गुरुवारी प्रथमच काही पैशांनी खाली आले. त्यामुळे पेट्रोल 39 पैसे तर डिझेल 37 पैशांनी स्वस्त झाले. ही दरकपात होण्यामागे जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली 15 टक्के घसरण कारणीभूत आहे. म्हणजेच उद्या जागतिक बाजारात पुन्हा दरवाढ झाली तर आज मिळालेला दिलासा तात्पुरता ठरू शकतो, असं शिवसेनेनं म्हटलंय.
आसाम, प. बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत इंधन महागाईच्या ‘फोडणी’चा ठसका लागू नये यासाठीही केंद्र सरकारची ही दरकपातीची मखलाशी असू शकते. म्हणजे ‘कारण’ जागतिक बाजारातील दर घसरणीचे आणि ‘निमित्त’ आहे देशातील पाच विधानसभा निवडणुकांचे, असा हा सगळा हिशेब आहे. अर्थात सामान्य जनताही वेळ येताच सगळा हिशेब ‘चुकता’ करीत असते हे कोणी विसरू नये इतकेच, अशी आठवण अग्रलेखातून केंद्र सरकारला करुन देण्यात आली आहे.
दरम्यान, केंद्रातील सरकारचे धोरण इंधन दरवाढीबाबत ‘हाताची घडी तोंडावर बोट’ असेच गेले वर्षभर राहिलं आहे, असा टोला शिवसेनेनं अग्रलेखातून सरकारला लगावला आहे.
थोडक्यात बातम्या-
देवेंद्रजी, आता आपणच शासनाला मार्गदर्शन करा- प्रकाश मेहता
“रश्मी शुक्ला यांनी पेन ड्राईव्ह दिला नव्हता तर, फडणवीस कोणत्या पेन ड्राईव्ह बद्दल बोलत होते?”
भांडूपच्या मॉलमधील रुग्णालयाला भीषण आग, दोन जणांचा मृत्यू
पोलीस दलाला जनतेच्या मनातून उतरवणाऱ्यांची गय करणार नाही- अजित पवार
“रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट म्हणून काम करत होत्या”
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.