बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुम्ही 19 आमदारांचं निलंबन केलं तेव्हा काय लोकशाहीचं सामूहिक हत्याकांड होतं काय?”

मुंबई | ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून विधानसभेत गोंधळ झाला. यानंतर भाजपच्या 12 आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. यावरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जुंपली आहे. यावरून शिवसेनेनं आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर सडकून टीका केलीये.

12 आमदारांचे निलंबन ही लोकशाहीची हत्या आहे असे विरोधी पक्षाला वाटत आहे. पण आमदारांच्या निलंबनाचे प्रसंग महाराष्ट्राच्या विधानसभेत या पूर्वीही घडलेच आहेत.फडणवीस मुख्यमंत्री असताना 2017 सालात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 19 आमदारांचं निलंबन झालंच होतं व लोकशाहीचं ते सामुदायिक हत्याकांड होतं, असं तेव्हा कुणाला वाटलं नव्हतं, असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधलाय.

महाराष्ट्रातील विरोधी पक्ष प्रत्येक वेळी केंद्राची बाजू घेऊन राज्यातील मराठा, ओबीसी समाजाशी उभा दावा का मांडत आहे तेच कळत नाही. या दाव्यात त्यांनी स्वतःचे 12 आमदार एक वर्षासाठी गमावले. त्याला नाइलाज आहे. ही लोकशाहीची हत्या आहे असे त्यांना वाटते, पण राज्यपाल महोदयांनी 12 नामनियुक्त सदस्यांची यादी वर्षभरापासून दाबून ठेवली तीसुद्धा लोकशाहीची हत्याच नाही काय?, असंही अग्रलेखात म्हटलंय.

सरकार पक्षाच्या आमदारांना खोट्या प्रकरणात गुंतवून आत टाकायचे व त्या बळावर सत्ता स्थापन करायची, असे कारस्थान शिजत असले तरी सरकारवर टाकण्यासाठी जो बॉम्ब विरोधकांनी उचलला होता तो त्यांच्याच हातात फुटलेला दिसत आहे, असंही अग्रलेखात म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

काँग्रेसच्या माजी मंत्र्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र; केली ‘ही’ मागणी

…तर भाजपचे 12 नव्हे, 18 आमदार निलंबित झाले असते- अजित पवार

‘पीक विम्याच्या बीड पॅटर्नमुळे सरकारचा फायदा’; दरेकरांचा गंभीर आरोप

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

जेईई मेन परीक्षेच्या तिसऱ्या आणि चौथ्या परिक्षेच्या तारखा जाहीर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More