बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर, आता भाजप पुढारी कोणाकोणाचे राजीनामे मागणार आहेत?”

मुंबई | देशात आरोग्यविषयक अराजक निर्माण झाले. त्यास फक्त केंद्रातील सरकार जबाबदार आहे. यावरच सर्वोच्च न्यायालयाने मोहर मारली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मारलेले ताशेरे गंभीर आहेत.  त्याबद्दल आता भाजप पुढारी कोणाकोणाचे राजीनामे मागणार आहेत? असा सवाल शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.

कोरोना परिस्थिती नीट हाताळली नाही, असा कांगावा करीत महाराष्ट्राचे सरकार बरखास्त करण्याची मागणी भाजप पुढारी करीत असतात. खरं तर हाच न्याय सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला लावला तर काय होईल? याचा विचार भाजप पुढाऱ्यांनी करायला हवा, असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधलाय.

महाराष्ट्रात कोविड इस्पितळांना लागलेल्या आगींचे कारण देत भाजपचे लोक राज्य सरकारचा राजीनामा मागतात. पण उत्तर प्रदेश, दिल्लीसह संपूर्ण देशात स्मशाने धगधगत असताना कुणाचा राजीनामा मागावा हे सर्वोच्च न्यायालयाने अप्रत्यक्ष सुनावलं आहे. ते काही असो. सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत बघ्याची भूमिका घेतल्यामुळेच देशावर हे अरिष्ट ओढवलं आहे, अशी टीकाही शिवसेनेनं केली आहे.

कोरोनाबाबत हिंदुस्थानची परिस्थिती विदारक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे आणि त्यास सोनिया गांधी किंवा पंडित नेहरू, इंदिरा गांधी जबाबदार नाहीत, असा टोला शिवसेनेनं केंद्र सरकारला लगावला आहे.

थोडक्यात बातम्या- 

काँग्रेस खासदार राजीव सातव यांची प्रकृती खालावली; राहुल गांधींचा थेट डॉक्टरांना फोन

“देशाबाबत कितीही गर्व करत असले तरी, अवैज्ञानिक लोक देशाला बरबाद करू शकतात”

मोठी बातमी! दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीला अटक

‘महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करा’; महाराष्ट्र दिनानिमित्त राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी

मास्क न घालणाऱ्यांची दादागिरी, दंड मागणाऱ्या पोलिसाच्या अंगावर सोडला कुत्रा

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More