बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…अशा पोरखेळांनी कोणाला हिंदू सम्राट वगैरे होता येणार नाही”

मुंबई | शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह भाजपवर देखील टीकेची झोड उठवण्यात आली आहे. देशात 2024च्या निवडणूकांची तयारी भाजपने सुरू केली आहे. तयारी म्हणजे काय तर देशाचं राजकारण साफ बिघडवून टाकायचं, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

देशातील जातीय आणि धार्मिक वातावरण बिघडवून व लोकांना कायद्याचे उल्लंघन करायला लावून पुढारीपणाचा कंडू शमविणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ती म्हणजे, अशा पोरखेळांनी व प्रायोजिक कार्यक्रमांनी कोणाला हिंदू सम्राट वगैरे होता येणार नाही, असा अप्रत्यक्ष टोला शिवसेनेने (Shivsena) राज ठाकरेंना लगावला आहे.

बाळासाहेब ठाकरे हिंदुह्रदयसम्राट होते. पण ते धर्मांध नव्हते. मला हिंदुंना जागे करायचे आहे पण त्यांचा खोमेनी व्हायचं नाही, असं बाळासाहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं. बाळासाहेबांची भ्रष्ट नक्कल करणाऱ्यांना मात्र हिंदुंचे ओवेसी व्हायची घाई झाली आहे, असा घणाघात सामनातून करण्यात आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात दोन ओवेसी एकत्र येऊन भाजपचा अजेंडा पुढे रेटीत आहेत. केंद्र सरकार मात्र हे मुकपणे पाहत आहे. चांगल्या कार्यकर्त्यांचे हे लक्षण नाही, अशी अप्रत्यक्ष टीका देखील शिवसेनेने राज ठाकरेंवर केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“गिरीश महाजनांनी मुलाबाळांची शपथ घालून सांगावं निधीसाठी माझे पाय धरले की नाही”

“मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावाला समजून सांगावं, नाहीतर…”

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा तुमच्या जिल्ह्यातील आजचे दर

“हिंदू लोकांनो, तुम्ही चार मुलांना जन्म द्या आणि त्यातील दोन मुलं ही…”

“ब्राम्हण मुठीतून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका करावी लागेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More