बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पण आताही अंधभक्त बोलतील काय हा साहेबांचा मास्टरस्ट्रोक”

मुंबई | केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसोबत शेतकऱ्यांनी जवळ जवळ वर्षभर आंदोलन केलं. अखेर वर्षभरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. पंतप्रधान मोदींच्या या निर्णयानंतर आता शिवसेनेने मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून पंतप्रधान मोदी आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

शेतकरी लढत राहिले, शहिद झाले व शेवटी जिंकले. 13 राज्यातील पोटनिवडणुकात पराभव स्विकारावा लागला. त्यातूनच आलेलं हे शहाणपण, असं म्हणत केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे. तर ‘शेतकरी मरू द्या, आजन्म आंदोलन करू द्या, पण सरकार एक पाऊलही मागे हटणार नाही’ या आडमुठेपणाचा त्याग करून सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले आहेत, असं म्हणत शेतकरी मागे हटणार नाहीत व उत्तरप्रदेश, पंजाब विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होईल, असा इशारा सामनातून देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी हे कृषी कायदे आणल्याचं मोदींनी सांगितलं पण शेतीचं हे खासगीकरण देशातील शेतकऱ्याला मान्य नव्हतं. आपला देश लोकशाही प्रक्रियेतून बाहेर पडून संपूर्ण खासगीकरणाच्या जोखडात जात असल्याचा आरोप सामनातून करण्यात आला आहे. तर दोन चार लोकांच्या अहंकारातून देशाची प्रतिष्ठा रसातळाला जात आहे. संपूर्ण स्वातंत्र्यातून स्वातंत्र्याचे संपूर्ण खासगीकरण व लोकशाहीचे मालकीकरण असा अध्याय लिहिला जात असल्याचा घणाघात सामनातून करण्यात आला आहे.

यापुढे तरी असे कोणते कायदे आणण्यापूर्वी केंद्र सरकारने नीट विचार करण्याचा सल्ला सामनातून देण्यात आला आहे. तर शेतकऱ्यांनी माघार घेतली नाही. तिन्ही कृषी कायदे मागे घेणे अखेर केंद्र सरकारला भाग पडले. शेतकऱ्यांच्या एकजूटीचा विजय झाला. मागे हटणार नाही, असे सांगणाऱ्यांचा अहंकार पराभूत झाला पण आताही अंध भक्त बोलतील, टकाय हा साहेबांचा मास्टर स्ट्रोक,’ असा खोचक टोला सामनातून लगावण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

चित्रा वाघ यांच्या आमदारकीच्या चर्चांना पूर्णविराम; भाजपकडून ‘या’ उमेदवाराला संधी

महाराष्ट्रातील कोरोना रूग्णसंख्येत मोठी घट, वाचा आकडेवारी एका क्लिकवर

आदित्य ठाकरेंसाठी वरळीची जागा सोडणाऱ्या उमेदवाराला शिवसेना देणार मोठं गिफ्ट?

अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्यावर लाईक्सचा वर्षाव! ‘या’ हिट गाण्याचा केला रिमेक

“पण हे कृषी कायदे मागे घेतल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More