बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बहोत हो गई महंगाई की मार, अब की बार…”, भाजपला खडे बोल

मुंबई | वाढत्या महागाईवरून केंद्रात सत्तेत असलेलं मोदी सरकार शिवसेनेच्या निशाण्यावर आलं आहे. शिनसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. महागाईच्या वणव्यात जनता होरपळून निघत असताना सरकार पक्षाने मात्र तोंडाला कुलूप लावलं असल्याची जहरी टीका शिवसेनेने केली आहे. (Shivsena Slams Modi Goverment Over Inflation In The Country)

एरवी महागाईच्या प्रश्नावर कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत आकाशपाताळ एक करणारी मंडळी आज सत्तेच्या सिंहासनाचे सुख उपभोगत असल्याचा घणाघात शिवसेनेने (Shivsena) केला आहे. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत केंद्रात सत्तेत आलेल्या भाजप सरकारला (BJP Goverment) त्यांच्याच तमाम घोषणांचा विसर पडला असल्याची टीकाही शिवसेनेने केली आहे.

तेल आणि डाळींसह भाज्यांच्या दरवाढीमुळे  गृहिणींचे बजेट कोलमडून गेले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती हेच महागाईचे मुळ आहे आणि त्यामुळे देशात महागाईचा आगडोंब उसळला असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. तर  ‘बहोत होगई मेहंगाई की मार, अबकी बार मोदी सरकार’ घोषणेची आठवणही शिवसेनेने करून दिली आहे. (Shivsena Slams BJP Goverment)

सर्वच क्षेत्रांमध्ये महागाईचा जबरदस्त भडका उडाल्याने सामान्य जनतेचे जगणे असह्य झाले आहे पण दिल्लीच्या तक्ख्तावर विराजमान झालेला सत्तारूढ पक्षाचा एकही नेता महागाईवर तोंड उघडायला तयार नाही. महागाईच्या मुद्द्यावर सत्ताधारी पक्षात सन्नाटा पसरलेला असला तरी नजीकच्या काळात हेच मौन महागाईच्या आगडोंबात भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाही, अशी खोचक टीका शिवसेनेने केली आहे.

थोडक्यात बातम्या-

चिंता वाढली! देशातील 13 राज्यात कोरोनाची तिसरी लाट धडकणार

“2024 ला महाविकास आघाडीचंच माॅडेल, तिन्ही पक्ष एकत्र लढले तर…”

राज कुंद्राला मोठा झटका; अश्लील व्हिडीओ प्रकरणी पुन्हा अडचणीत

मोदी सरकार ‘अॅक्शन मोड’वर ; आता ‘या’ गोष्टींवर मिळणार अनुदान

पोटावरची चरबी कमी करायचीय? मग ‘या’ 5 सवयी लावून घ्याच

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More