मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 12 खासदारांसोबत दिल्लीत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शिंदे गटाकडून नवे गटनेते म्हणून निवडण्यात आलेल्या राहूल शेवाळे यांनी एक गौप्यस्फोट केला. मोदीबरोबर युतीसाठी प्रयत्न करा, असा आदेश उद्धव ठाकरेंकडून देण्यात आला होता. संजय राऊत यांच्यामुळे हा डाव फिस्कटला, असंही त्यांनी सांगितलं. यावर राऊतांनी पत्रकार परिषद त्याला उत्तर दिलं.
शिंदे गट आज जे लोक युती युती करतायत. पंतप्रधानांच्या भेटीससंदर्भात गौप्यस्फोट करतायत ते लोक 2014 मधे कुठे गेले होते? तेव्हा विधानसभेला युती कुणी तोडली?, असा सवालही संजय राऊत यांनी खासदारांना केला आहे. 2014 साली युती तोडली यापैकी किती लोकांनी भाजपला यासंबधी का प्रश्न विचारला?. का युती तोडला असा प्रश्न भाजपला का विचारला नाही?, असा सवाल त्यांनी शेवाळे आणि इतर नेत्यांना केला.
शिंदेंसोबत जे खासदार सध्या आहेत त्यांच्याबद्दल बोलताना राऊत म्हणाले, मुर्मूंना पाठिंबा द्या आम्ही सेनेतच राहू, असं खासदार म्हणाले होते. किती लोक निष्ठावंत राहिले असाही प्रश्न त्यांनी विचारला. 2019 साली भाजपने जर शब्द पाळला असता तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार होते. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या पाठीत कोणी खंजीर खुपसला असेल तर भाजपने खुपसला आहे. हे त्यांनी लक्षात घ्यावं.
निवडणुकीच्या मैदानात सगळ्यांना उत्तर देणार. 2024 ला सगळी सुत्र बदलेली असतील, अशी भविष्यवाणी राऊत यांनी केली. मॅटनी शोला दिवार आणि शोले पिक्चर चालला हे लक्षात घ्या. आजही महाराष्ट्रात मराठी शो चालतात हे लक्षात घ्या, असंही ते म्हणाले.
थोडक्यात बातम्या
“सत्तेच्या नशेत धुंद झालेले बंडखोर महापुरुषांच्या प्रतिमा ढकलून देत आहेत”
‘त्या’ भेटीचा उल्लेख करत खासदार राहुल शेवाळेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!
‘…म्हणूनच हे बारा खासदार माझ्याकडे आलेत’; एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्ली दौऱ्यामागचं सांगितलं कारण, म्हणाले…
…नाहीतर पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाहीत; शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी
Comments are closed.