शेतकऱ्यांसाठी दिलेले एवढे कोटी कुठे गेले?, शिवसेनेचा सवाल

मुंबई | आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईत पोहोचलेल्या किसान लाँग मार्चला शिवसेनेनं आपला पाठिंबा दिलाय. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विक्रोळीत किसान लाँग मार्चला भेट दिली. शिवसेना नेते एकनाथ शिंदेदेखील यावेळी सोबत होते.

आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले, शेतकऱ्यांसाठी एवढे कोटी दिले, असा दावा सरकार करत आहे. मात्र एवढं करुनही एवढ्या मोठ्या संख्येनं शेतकरी मुंबईत धडकत असतील तर कर्जमाफीची रक्कम कुठे गेली? असा सवाल यावेळी आदित्य ठाकरे यांनी विचारला. 

शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देऊन थांबणार नाही तर शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढू, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.