कोरेगाव भीमाची घटना घडवणाऱ्यांनो, हिंमत असेल तर पुढे या!

संग्रहित फोटो

मुंबई | कोरेगाव भीमाची भीषण घटना ज्यांनी कुणी घडवली असेल त्यांनी हिंमत असेल तर पुढे यावं, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. ते वाशीत आयोजित ग्लोबल कोकण महोत्सवामध्ये बोलत होते. 

महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण करुन स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा काहींचा स्वार्थ आहे, मात्र अशांना शिवसेना सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

राजापूरमध्ये रिफायनरी उभारुन कोकणच्या विकासाचा नाश होणार आहे. मात्र शिवसेना हा असला प्रकार कदापि खपवून घेणार नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी मोदी सरकारवरही टीका केली.