बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या शिवसेनेतील दोन नेत्यांचे राजीनामे???

मुंबई  | शिवसेनेनं मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या दोन नेत्यांचे राजीनामे घेतल्याची माहिती आहे. रवींद्र वायकर आणि अरविंद सावंत या दोघांचेही राजीनामे घेतल्याचं कळतंय.

भाजपकडून ‘ऑफिस ऑफ प्रॉफिटनुसार’ आक्षेप घेण्याची तयारी केली होती. मात्र त्यापूर्वीच शिवसेनेने दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे घेऊन ठेवले आहेत. वायकर आणि सावंत यांच्याकडून मात्र अशा कुठल्याही घटनेचा इन्कार करण्यात आला आहे.

वायकर यांची 11 फेब्रुवारीला मुख्यमंत्री सचिवालयात प्रमुख समन्वयक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर 14 फेब्रुवारीला अरविंद सावंत यांची महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्य शासनाने अध्यादेश काढून ही नियुक्ती केली आहे. अध्यादेशात रवींद्र वायकर आणि अरविंद सावंत यांना देण्यात येणारे, भत्ते आणि सुविधा यांचा उल्लेख वादाचं कारण बनलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या- 

जीवाची पर्वा न करता तिरंगा वाचवणाऱ्या कुणाल जाधवांचा सत्कार

तृप्ती देसाईंचं चारित्र्यहनन केल्याप्रकरणी पहिली तक्रार दाखल

महत्वाच्या बातम्या- 

राम मंदिरासाठी ट्रस्ट, तर मग मशिदीसाठी का नाही?- शरद पवार

मल्लखांबच्या माध्यमातून शिवरायांना अनोखी मानवंदना, हा व्हिडीओ पाहाच…

इंदोरीकर महाराजांनी थोडा संयम ठेवावा- राधाकृष्ण विखे पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More