मुंबई | शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून बेळगावमध्ये मराठी लोकांवर होणाऱ्या हल्ल्यांवर भाष्य केलं आहे. तसेच बेळगावात सध्या मराठी लोकांवर जे हल्लेसत्र सुरु आहे ते संतापजनक आहे. महाराष्ट्राने एकवटून या हल्ल्याचा प्रतिकार केलाच पाहिजे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही विनंती करतो, कर्नाटकात आणि दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. बेळगावातील मराठी भाषिकांवरील अत्याचारांविरुद्ध एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि देशाच्या पंतप्रधानांकडे घेऊन जाच. बेळगावातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवा, मराठी माणसाला न्याय द्या, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे.
बेळगावातील मराठी माणसांवरील अत्याचार थांबत नसतील तर केंद्राने संपूर्ण सीमा भागास केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करावं, असंही शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलं आहे.
दरम्यान,मराठी भाषिकांच्या दुकानांवरील मराठी पाटय़ा उचकटवून टाकणे, मराठी ‘नंबरप्लेट’ असलेल्या गाडय़ांवर हल्ले करणे, मराठी तरुणांनी मोबाईलवर मराठी भाषेचे स्टेटस ठेवल्याचा राग म्हणून त्यांना अमानुष मारहाण करणे, ‘मराठी भाषिक वाघ आहेत’ अशा प्रकारच्या स्टेटसवर आक्षेप घेऊन जुलूम करणे हे अमानुष आणि लोकशाहीविरोधी आहे, असं शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलंय.
थोडक्यात बातम्या-
आमचाही राजकीय पक्ष आहे, आम्ही काही गोट्या खेळत नाही – इम्तियाज जलील
थकित वीजबिल असणाऱ्यांची वीज तोडू नका, अन्यथा…- उदयनराजे भोसले
ईडीची मोठी कारवाई! सुशील कुमार शिंदे यांची मुलगी आणि जावयाची मालमत्ता ईडीकडून जप्त
रघुराम राजन यांचं मोदी सरकारवर टीकास्त्र, म्हणाले…
10 वर्षाच्या मुलीने गळफास लावून केली आत्महत्या; कारण ऐकून तुम्हीही सुन्न व्हाल
Comments are closed.