बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्र दिल्लीशी झगडा करतो तेव्हा दिल्लीस शरण यावं लागतं”

मुंबई | पंतप्रधान मोदींनी ठाकरे यांना भेटण्यासाठी इतका वैयक्तिक वेळ का दिला, हा प्रश्न त्यांनी मोदींना विचारला तर त्यावर उत्तर आणि औषध दोन्ही मिळेल. पवारही अधूनमधून मोदी यांना भेटत असतात आणि बोलत असतात. पंतप्रधानांशी संवाद ठेवण्यासाठी मधल्या अडत्यांची गरज नाही व महाराष्ट्राने उगाच दिल्लीशी भांडण करण्याचीही गरज नाही. महाराष्ट्र दिल्लीशी झगडा करतो तेव्हा दिल्लीस शरण यावे लागते हा इतिहास आहे, असं शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय.

महाराष्ट्राला संकटकाळी केंद्राने मदत करायला हवी. मधल्या कोरोना संकट काळात मुख्यमंत्री ठाकरे यांनी थेट पंतप्रधानांना फोन लावून मदत मागितली तेव्हा पंतप्रधानांचा प्रतिसाद सकारात्मक होता, असे मुख्यमंत्री ठाकरे सांगतात. आता पंतप्रधान महाराष्ट्राला मदत करतात म्हणून राज्य सरकारने वेगळी भूमिका घ्यावी असे येथील विरोधी पक्षाला वाटत असेल तर ते कच्चे आहेत, असं म्हणत शिवसेनेनं अग्रलेखातून राज्यातील भाजप नेत्यांवर निशाणा साधला.

पंतप्रधान मोदी यांच्या कानावर मुख्यमंत्र्यांनी हे सर्व नक्कीच घातलं असणार. मंगळवारच्या पवार-ठाकरे चर्चेतही लढाईचा आराखडा ठरलाच असेल. श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ कुरुक्षेत्राच्या मधोमध नेऊन उभा केला व दुष्मनाशी चौफेर मुकाबला करून अधर्माचा पराभव केला. महाराष्ट्राचे सरकार कुरुक्षेत्राच्या मध्यभागीच उभे आहे. विरोधकांनी स्वतःचा अभिमन्यू हेऊ देऊ नये म्हणजे झालं, असा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

दरम्यान, कोरोना, आर्थिक संकट, बेरोजगारी, निसर्ग संकटाशी महाराष्ट्र सामना करीत आहेच. त्यात आणखी एक ‘ईडी’ किंवा सीबीआयचे संकट सुल्तानी पद्धतीने कोसळले असे मानून मुकाबला करणे हेच आता योग्य आहे. ममता बॅनर्जी यांनी या सुल्तानशाहीशी अशाच पद्धतीने लढून विजय मिळविला. महाराष्ट्रानेही तोच मार्ग स्वीकारणं गरजेचं असल्याचं मत अग्रलेखात मांडण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

सरकारला कसं अडचणीत आणायचं?, फडणवीसांच्या घरी प्लॅन ठरला

“ममतादीदींप्रमाणे सुल्तानी पद्धतीने ईडी आणि सीबीआयचा सामना करायला हवा”

उद्या गोळ्या जरी घातल्या तरी विचारांपासून मागे हटणार नाही- गोपीचंद पडळकर

आषाढीला परवानगी द्या, वारी होत नसल्यामुळेच कोरोना वाढतोय- संभाजी भिडे

‘…पण तुम्ही त्या अगोदरच जेलमध्ये असाल’; निलेश राणेंचं अजित पवारांवर टीकास्त्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More