बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ममतादीदींप्रमाणे सुल्तानी पद्धतीने ईडी आणि सीबीआयचा सामना करायला हवा”

मुंबई | महाराष्ट्रातील काही मंत्री, आमदार, सरकारविषयी सहानुभूती ठेवणारे उद्योजक यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावून राज्यातील विरोधी पक्षाने हलचल माजवण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. या अशा दबावापुढे सरकार पक्षाने न झुकता प्रतिकार करत राहणं हाच योग्य उपाय आहे, असं शिवसेनेनं आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय.

कोरोना, आर्थिक संकट, बेरोजगारी, निसर्ग संकटाशी महाराष्ट्र सामना करीत आहेच. त्यात आणखी एक ‘ईडी’ किंवा सीबीआयचे संकट सुल्तानी पद्धतीने कोसळले असे मानून मुकाबला करणे हेच आता योग्य आहे. ममता बॅनर्जी यांनी या सुल्तानशाहीशी अशाच पद्धतीने लढून विजय मिळविला. महाराष्ट्रानेही तोच मार्ग स्वीकारणं गरजेचं असल्याचं मत अग्रलेखात मांडण्यात आलं आहे.

मागे ‘ईडी’ने भलत्याच प्रकरणी पवार यांना नोटीस बजावली. तेव्हा पवार रस्त्यावर उतरुन ‘ईडी’ कार्यालयाकडे जायला निघाले. महाराष्ट्राचे वातावरण तेव्हा ढवळून निघाले होते. ईडी, सीबीआय किंवा आपले महामहीम राज्यपाल महोदय यांचा वापर करून राज्यातील सरकार अस्थिर होईल हा भ्रमाचा भोपळाच आहे, असं म्हणत शिवसेनेनं विरोधकांवर निशाणा साधला.

पंतप्रधान मोदी यांच्या कानावर मुख्यमंत्र्यांनी हे सर्व नक्कीच घातले असणार. मंगळवारच्या पवार-ठाकरे चर्चेतही लढाईचा आराखडा ठरलाच असेल. श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ कुरुक्षेत्राच्या मधोमध नेऊन उभा केला व दुष्मनाशी चौफेर मुकाबला करून अधर्माचा पराभव केला. महाराष्ट्राचे सरकार कुरुक्षेत्राच्या मध्यभागीच उभे आहे. विरोधकांनी स्वतःचा अभिमन्यू हेऊ देऊ नये म्हणजे झाले, असा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या- 

उद्या गोळ्या जरी घातल्या तरी विचारांपासून मागे हटणार नाही- गोपीचंद पडळकर

आषाढीला परवानगी द्या, वारी होत नसल्यामुळेच कोरोना वाढतोय- संभाजी भिडे

‘…पण तुम्ही त्या अगोदरच जेलमध्ये असाल’; निलेश राणेंचं अजित पवारांवर टीकास्त्र

“…तर किसान सभा राज्य सरकारचा कठोर प्रतिकार करेल”

लसीच्या अपुऱ्या साठ्यामुळे उद्या लसीकरण मोहिमेला पुन्हा लागणार ब्रेक!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More