“ठाकरे सरकार कोसळण्यात सर्वात मोठं कारण नानाा पटोले”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत वाद समोर येताना दिसत आहेत. अनेकांनी काँग्रेस अध्यक्ष नाना पटोलेंवर (Nana Patole) उघडउघड नाराजी व्यक्त केली. अशात शिवसेनेने (Shivsena) देखील नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले आहेत.

शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे सरकार पडायला नाना पटोले (Nana Patole)च जबाबदार असल्याचं आता शिवसेनेनं म्हटलंय.

महाविकास आघाडी सरकारमध्ये नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि तिथूनच संकटांची मालिका सुरु झाली. महाविकास आघाडी सरकार कोसळण्यासाठी हे प्रमुख कारण असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.

सामनाच्या अग्रलेखातून बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाची बाजू घेण्यात आली आहे. थोरात हा महाराष्ट्र काँग्रेसचा एक निष्ठावंत चेहरा आहे. अनेक वादळात त्यांनी काँग्रेसला धरून ठेवलं. पण नाशिक पदवीधर मतदार संघात काँग्रेसने विश्वासात घेतले नाही व ज्येष्ठता असूनही अपमानीत केले, असा आरोप थोरात यांनी केला आहे.

थोरात यांच्यासारख्या नेत्यांचा सन्मान राखायचा नाही तर कुणाचा राखायचा, असा सवाल सामनातून नाना पटोले यांना विचारण्यात आलाय.

महत्त्वाच्या बातम्या-