बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कराडांना मंत्रिपद म्हणजे पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव”

मुंबई | मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलात एकूण 43 जणांना काल मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून चार नेत्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने प्रीतम मुंडे यांच्यासह पंकजा मुंडेही नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

डॉ. भागवत कराड हे ओबीसी नेते आहेत. त्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे ते मराठवाड्यातील आहेत. तरीही मुंडे भगिनींनी कुणाचेच अभिनंदन न केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

भाजपच्या महाराष्ट्रातील बहुतेक बड्या नेत्यांनी आणि खासदारांनी केंद्रातील नव्या मंत्र्यांचं अभिनंदन केलं आहे. केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या महाराष्ट्रातील मंत्र्यांचंही अभिनंदन केलं आहे, असं असताना मुंडे भगिनींनी अभिनंदनाचं ट्विट न केल्यानं त्या नाराज असल्याचं बोललं जात आहे. यावरून शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून कराडांना मंत्रिपद म्हणजे पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव असल्याचा दावा केलाय.

भागवत कराड हे राज्यमंत्री झाले. पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे. कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या सावलीत वाढले, पण प्रीतम मुंडे यांचा विचार न करता कराड यांना मंत्री केले गेले. वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी व पंकजा मुंडे यांना धडा शिकविण्यासाठीच हे केले काय, अशी शंका घ्यायला जागा आहे, असं शिवसेनेनं आजच्या अग्रलेखात म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

“चायपेक्षा अनेकांच्या किटल्या गरम झाल्यात, किटल्यांना थंड करण्याचाच हा प्रकार” 

‘माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळा’; नव्या मंत्र्यांना नरेंद्र मोदींनी केल्या ‘या’ सूचना

‘…तर मी पुन्हा येईन’; भर कार्यक्रमात संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

रस्त्यावर ‘वर्दी उतरव’ म्हणत तरूणाची पोलिसांसमोर मुजोरी; अटकेनंतर ढसाढसा रडला

एकनाथ खडसेंची तब्बल 9 तास ईडी चौकशी; चौकशीला खडसेंचा सकारात्मक प्रतिसाद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More