बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ भाजप नेत्याचं सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं केलं तोंडभरून कौतुक

मुंबई | कोरोनामुळे अनेक पालकांचा जीव जात असल्याने लहान मुलांचा प्रश्न ऐरणीवर पडला आहे. ही गंभीर बाब लक्षात घेत मध्य प्रदेश सरकारनं अनाथ मुलांना प्रति महिना 5 हजार रुपये पेन्शन देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर या मुलांची मोफत शिक्षणाची जबाबदारीही सरकार उचलणार आहे. मध्ये प्रदेश सरकारच्या या निर्णयाचं शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून तौंडभरून कौतुक केलं आहे.

कोरोना काळात सध्या जी मुले अनाथ होत आहेत ते तर सर्व डोळय़ांसमोरच घडत आहे. अनेक लहान मुलांना तर माहितीही नसते की, कोरोनाशी झुंज देणारे त्यांचे माता-पिता कदाचित इस्पितळातून पुन्हा कधीच घरी येणार नाहीत. या सर्व अनाथ मुलांच्या भविष्याचा विचार पालक म्हणून सरकारलाच करावा लागेल.त्यांना आधार द्यावा लागेल. त्यांना मानवतेची कवचकुंडले द्यावीच लागतील, जी मध्य प्रदेशच्या शिवराजसिंह चौहान यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे, असं शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलंय.

देशात रोज साडेतीन लाखांवर कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातही लहान मुलांच्या अनाथपणाचे संकट ही कोरोना काळातील भयंकर आपत्ती आहे. लोकांना जगायचे आहे. जे जगले नाहीत, ज्यांना राज्यकर्ते वाचवू शकले नाहीत त्यांच्या निराधार मुलांना आधार द्यावाच लागेल. हे सर्व करण्यासाठी सामाजिक संस्था पुढाकार घेतीलच, पण राज्यकर्ते अनाथ मुलांसाठी काय करू शकतात ते मध्य प्रदेशच्या सरकारने दाखवलं आहे, असं सांगत शिवसेनेने शिवराजसिंह चौहान यांचे आभार मानले आहेत.

आज लोकांना ‘सेंट्रल विस्टा’सारखे दिल्लीची सुरत बिघडवणारे 25 हजार कोटींचे प्रकल्प नको आहेत. मंत्र्यांच्या प्रसिद्धीवर होणाऱया पाच-पंचवीस कोटींच्या खर्चावरही रोष आहे, अशा शब्दात शिवसेनेने भाजप मुख्यमंत्री शिवराज चौहान यांचं कौतुक केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘लहान मुलांचं लसीकरण करण्यापेक्षा लस दान करा’; WHO नं दिला महत्वाचा सल्ला

तौत्के चक्रीवादाळाचं संकट; NRDF च्या 10 टीम्स ‘या’ भागात तैनात

‘शंभर बॅनरची पीआर मात्रा हेच शिवसेनेचं कर्तृत्व’; अतुल भातखळकर यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

सेकंडहँण्ड कारसाठी आई-बापानं पोटच्या मुलासोबत जे केलं ते ऐकून पोलिसही हादरले!

‘शरद पवार गेल्याची दुःखद बातमी आली अन्…’; शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचं पत्र चर्चेत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More