महाराष्ट्र मुंबई

“महाराष्ट्र जातीपातीच्या लढाईत फाटू नये याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे”

मुंबई | छत्रपती शिवरायांनी कष्ट आणि शौर्यातून निर्माण केलेले हे महाराष्ट्र राज्य जातीपातीच्या लढाईत फाटू नये याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे, अशी भूमिका शिवसेनेनं मांडली आहे.

उदयनराजे आणि संभाजीराजे हे छत्रपतींच्या गादींचे वारसदार आहेत. मराठा आरक्षणाच्या लढ्यात दोन्ही ‘राजे’ आघाडीवर आहेत. या दोन भूमिकांमुळे सातारा व कोल्हापूरकर घराण्यांत आरक्षणाबाबत वाद आहेत किंवा लढाईत फूट पडली आहे असं जे पसरवले जात आहे ते खरे नाही, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

दरम्यान, सातारा तसेच कोल्हापूरच्या ‘राजां’नी घेतलेल्या भूमिकांचा वेगळा अर्थ कोणी काढू नये, असं शिवसेनेनं म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

आमदार निवासात मध्यरात्री फोन, बॉम्बने उडवून देण्याची धमकी

नव्या कृषी कायद्यांना काँग्रेस खासदाराचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान

भाजप नेत्या उमा भारती एम्समध्ये दाखल

बडोद्यात तीन मजली इमारत कोसळली; अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या