“बाजारात नवी ऑफर, ठाकरे सरकारविरूद्ध बेताल बोला आणि केंद्राची सुरक्षा मिळवा”
मुंबई | राज्यातील वातावरण अनेक मुद्द्यांवरून तापलेलं दिसत असताना राणा दांपत्य व हनुमान चालिसाच्या वादावर आज सामना अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. या सर्वामागे भाजपचंच (BJP) कुचकं डोकं असल्याचा आरोप शिवसेनेने (Shivsena) केला आहे.
राणा दांपत्याला अटक केल्यानंतर भाजपची मळमळ बाहेर पडली. राणा दांपत्याचे गुन्हे हे फसवाफसवी आणि अफरातफरीचे आहेत, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. तर राणा दांपत्याला पुढे करून मुंबईत वातावरण बिघडवायचे हेच ठरवलं होतं, असा आरोप देखील शिवसेनेने केला आहे.
ठाकरे सरकारविरूद्ध बेताल बोला आणि केंद्राची सुरक्षा मिळवा, अशी ऑफर बाजारात आलेली दिसते, असा घणाघात शिवसेनेने केला आहे. भाजपवाले चोर लफंग्यांचे समर्थन करत आहे, अशी खोचक टीकाही सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.
दरम्यान, काँग्रेसमध्ये असताना ईडीच्या भयाने जे शेपट्या आत घालून भाजपचे गुलाम झाले, असे लोक शिवसेनेला आव्हान देत आहेत, असा टोला सामना अग्रलेखातून लगावण्यात आला आहे. तर खोटेपणाच्या पायवर उभ्या असलेल्या नवनीत राणा हनुमान चालिसेचं राजकारण करतात आणि भाजप या भंपकपणाच्या नौटंकीत टाळ्या वाजवतोय, अशी टीका देखील शिवसेनेने केली आहे.
थोडक्यात बातम्या-
“…आणि समस्त भाजप नाच्या पोरांसारखा त्या बाईच्या इशारावर नाचतो”
“…त्यामुळेच संजय राऊतांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलला”
मोठी बातमी! भायखळा तुरूंगात नवनीत राणांची तब्येत खालावली
IPL 2022: कृणाल पांड्याची विकेट अन् पोलार्डचं हटके सेलिब्रेशन; पाहा व्हिडीओ
“…हा तर महाराष्ट्राचा अपमान”; जितेंद्र आव्हाड मंगेशकर कुटुंबियांवर बरसले
Comments are closed.