बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ते’ चोख काम नवाब मलिकांनी केले आणि महाराष्ट्रावर उपकारच झाले

मुंबई | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणापासून राज्यातील राजकिय वातावरण चांगलंच ढवळून निघालं. या प्रकरणावरून राजकारण रंगत असताना शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून या प्रकरणावर टीका करण्यात आली आहे. आर्यन खान प्रकरणात एका केंद्रीय यंत्रणेचे थोबाड फुटले तसे इतरांचेही लवकरच होईल, अशी टीका करण्यात आली आहे. सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजप आणि एनसीबीवर टीका करण्यात आली आहे तर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या कामाची प्रशंसा करण्यात आली आहे.

नवाब मलिक यांनी आर्यन खान प्रकरणात पुरावे समोर ठेवत अनेक खुलासे केले. तर आर्यन खान विरोधात अंमली पदार्थ बाळगल्याचा, सेवन केल्याचा कुठलाही पुरावा आढळला नसल्याचे निरीक्षण मुंबई हायकोर्टाने नोंदवले असल्याचे म्हणत एनसीबीच्या टोळीने खंडणीसाठी हा बनाव रचला असल्याची टीका सामनातून करण्यात आली आहे. फक्त महाराष्ट्रासारख्या राज्यात डेरा टाकून केंद्रीय तपास यंत्रणांनी सुरू केलेले नसते उद्योग हेच मोठे कारस्थान दिसत असल्याचा घणाघात शिवसेनेने केला आहे.

तर ‘भारतीय जनता पक्षाचे लोक या टोळभैरवांच्या खंडणीचोरीचे समर्थन करत होते. एनसीबीच्या टोळीचे कारनामे पुराव्यांसह समोर आणण्याचं चोख काम मंत्री नवाब मलिक यांनी केलं आणि हे महाराष्ट्रावर मोठे उपकारच झाले, नवाब मलिक यांनी एनसीबीच्या खोटेपणावरच हल्ला केला,’ या शब्दात सामनातून नवाब मलिक यांची प्रशंसा करण्यात आली आहे. नवाब मलिकांची प्रशंसा करताना शिवसेनेने एनसीबी आणि भाजपवर देखील हल्लाबोल केला आहे.

एनसीबी अधिकारी पाव ग्रॅम, दोन ग्रॅम चरस पकडून मोठाच तोरा दाखवत होते. पण नवाब मलिकांनी अनेक बाबतीत त्यांची बनावटगिरी सिद्ध केली आणि तेव्हापासून भारतीय जनता पक्षाची वाचाच गेली असल्याचा खोचक टोला सामनातून लगावण्यात आला आहे. तर ईडीने मुंबईत केलेल्या कारवाया व धरपकडी या ‘एनसीबी’ छापच आहेत, असा आरोपही सामनातून करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

“राज्यातील वातावरण भाजपकडून गढुळ केलं जात आहे”

किरीट सोमय्या आज दिल्ली दौऱ्यावर, करणार ‘या’ नेत्यांच्या घोटाळ्याची चौकशी

कंगनाचं पुन्हा वादग्रस्त विधान; शीख समुदायाचा ओढवून घेतला रोष

मलिकांनी ट्विटरवर मध्यरात्री फोडला बाॅम्ब, समीर वानखेडेंचा ‘तो’ फोटो केला शेअर

महाराष्ट्रातील कोरोनाला आला आटोक्यात, जाणून घ्या आकडेवारी एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More