“आणखी बरेच धक्के भाजप आणि मिंधे गटाला पचवायचेत”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून (Saamana) भाजप आणि शिंदे गटावर टीका करण्यात आली आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ म्हणजे भाजप (Bjp) ची मक्तेदारी राहिलेली नाही. विधान परिषद निवडणुकीचे ताजे निकाल ही भाजप-मिंधे सरकारला चपराक असल्याचं सामनातून म्हटलं आहे.

नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला आहे. पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadnavis) राजकीय वर्चस्व आहे. तरीही भाजप पराभूत होतो. हाती सत्ता, पोलीस, पैशाचे बळ असूनही पदवीधर-शिक्षक बधले नाहीत, त्यांनी भाजपचा (Bjp) पचकाच केल्या शिवसेनेनं सामनातून म्हटलंय.

कोकणातील शिक्षक मतदारसंघातील विजय हा शिवसेनेस धक्का वगैरे असल्याची आवई उठवली जात आहे. तो शुद्ध मूर्खपणा आहे. महाराष्ट्रातील इतर चार जागांवर भाजपच्या हाती भोपळा लागला. त्यावर जरा बोला, असा टोला अग्रलेखातून भाजपला लगावला आहे.

सगळ्यात जास्त वादात आणि गर्जत राहिली ती नाशिक पदवीधरांची निवडणूक. येथे काँग्रेसचे जुनेजाणते उमेदवार सुधीर तांबे यांनी घोळात घोळ घातला व ऐन वेळेस माघार घेऊन सत्यजीत तांबे या आपल्या चिरंजीवास अपक्ष म्हणून अर्ज भरायला लावला. पिता की पुत्र हे आधीच ठरवायला हवे होते. मतदारसंघात तांबे आणि काँग्रेसने मतदारांची नोंदणी केली आहे, असं अग्रलेखात म्हटलंय.

कोणत्याही परिस्थितीत तांबे हेच जिंकणार होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे सत्यजीत हे भाचे. त्यामुळे मामांची कोंडी झाली. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वास हा नगरचा तिढा शांत डोक्याने व सन्मानाने सोडवता आला असता. झाकली मूठ तशीच ठेवून सत्यजीत तांबे हेच काँग्रेसचे उमेदवार असा पवित्रा घेता आला असता. पण तांबे यांच्या निमित्ताने मामांची जिरवता येईल काय? असा डाव कदाचित असावा. त्यात किती तथ्य ते त्यांनाच माहीत, पण शेवटी ऐन वेळेस अपक्ष शुभांगी पाटील यांच्या पाठिंब्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला व त्यांच्या विजयासाठी शर्थ करूनही सत्यजीत तांबे हे विजयी झाले, असं अग्रलेखात म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या-