हिंदुत्ववादावरून ठाकरे गट-कॉँग्रेसमध्ये जुंपली, ट्वीटरवर मोठा राडा

Shivsena Thackeray vs Congress

Shivsena Thackeray vs Congress | विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडी आता आगामी महानगर पालिका निवडणुकीकडे वळली आहे. यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा ‘हिंदुत्वा’चा नारा दिला जात आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना हिंदुत्वापासून दुरावल्याचा अपप्रचार खोडून काढा, असे आदेश पदाधिकारी व माजी नगरसेवकांना दिले आहेत. (Shivsena Thackeray vs Congress )

ठाकरे गटाची नुकतीच यासंबंधी बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी शिवसेना आधीही लढत होती, उद्याही लढेल आणि लढत राहील असा नारा दिलाय. लोकसभेत शिवसेना (ठाकरे) हिंदुत्वापासून दुरावल्याचा अपप्रचार करण्यात आला, असं पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत स्पष्ट केलंय. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुकीसाठी आपली रणनिती बदलली आहे.

महाविकास आघाडीत बिघाडी?

लोकसभेत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालाय. ठाकरेंच्या शिवसेनेला 20 च्या पुढेही आकडा गाठता आला नाही. या पराभवानंतर महाविकास आघाडी आता टिकणार नाही, असे दावे राजकीय वर्तुळात करण्यात आले. इतकंच नाही तर, या महापालिका निवडणुकीपूर्वीच मविआत बिघाडी होणार, असंही बोललं जातंय.

अशात उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा समोर आणल्याने त्यांचा मित्र पक्ष असलेला कॉँग्रेस गट नाराज झाला आहे. झालं असं की, शिवसेनेचे (ठाकरे) सचिव मिलिंद नार्वेकर यांनी काल (6 डिसेंबर) एक्सवर एक पोस्ट केली. बाबरी मशिद विध्वंसाला काल 32 वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर त्या घटनेचं समर्थन करणारी पोस्ट नार्वेकरांनी एक्सवर केली होती.मात्र, याच पोस्टवर कॉँग्रेसचे रईस शेख यांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केलीये. (Shivsena Thackeray vs Congress )

‘त्या’ पोस्टने चर्चेला उधाण

त्यांनी एक्सवर पोस्टदेखील लिहिली आहे. “आपल्याला आठवण करून देतो की शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मागील दोन निवडणुकांमध्ये लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष मतदारांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे. भारताच्या इतिहासातील त्या काळ्या दिवसाचे अशा प्रकारे गौरवीकरण अयोग्य आणि अनावश्यक आहे. अशा प्रकारच्या गौरवीकरणाचा मी तीव्र निषेध करतो.”,असं कॉँग्रेसचे नेते रईस शेख म्हणाले आहेत.

त्यांची ही पोस्ट आता चर्चेत आली आहे. या पोस्टमुळे हिंदुत्वाच्या मुद्दयावरून कॉँग्रेस आणि ठाकरे गटात जुंपली असल्याचं म्हटलं जातंय. या दोन्ही पोस्ट आता व्हायरल झाल्या असून राजकीय वर्तुळात याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढलेल्या महाविकास आघाडीत आता बिघाडी होणार का?, याबाबतही आता चर्चा सुरू झाल्या आहेत. (Shivsena Thackeray vs Congress )

News Title – Shivsena Thackeray vs Congress

महत्वाच्या बातम्या- 

जरांगे पाटलांची फडणवीस सरकारला नवीन डेडलाईन; थेट इशारा देत म्हणाले…

आज शनिवारी, महादेव ‘या’ राशींवर करणार सुखाचा वर्षाव!

भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन!

नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पुढील 5 वर्षांचा खुलासा म्हणाले, आता सामना…

“पवित्र ठिकाणी असताना कुठे त्या गटाराचं नाव…”, ‘या’ बड्या नेत्यावर चित्रा वाघ यांची टीका

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .