उद्धव ठाकरेंचं शिंदे गटावर खोचक शब्दात टीकास्त्र!

Shivsena

Shivsena l विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपलापला जाहीरनामा प्रसिद्ध करत आहेत. अशातच शिवसेना उद्धव ठाकरे गटाने देखील जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मात्र यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

मुलींसह मुलांना मोफत शिक्षण देणार :

यावेळी राज्यातील बेकारी तर लवकरच हटवली पाहिजे. परंतु आत्ताच मिंधे सरकार आहे, पण त्यांच्या कारभारात याबद्दल काहीच तरतूद दिसत नाही. तसेच त्यांनी फक्त गद्दारांना नोकरी दिली आहे, परंतु बाकीच्या जनतेला त्यांनी काहीच दिलं नाही. पण आम्ही महाराष्ट्रातील भूमीपुत्रांना व मुला-मुलींना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊ असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नमूद केलं आहे.

याशिवाय मुंबई येथील पळवलेले वित्त केंद्र धारावीत ऊभारू असं देखील त्यांनी सांगितलं आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाच्या वचननाम्याचं प्रकाशन देखील करण्यात आलं आहे त्यावेळी ते बोलत होते. याशिवाय महाराष्ट्रात मुलींना मोफत शिक्षण दिलं जातं आहे, परंतु ही एक चांगली गोष्ट आहे. पण आमचं सरकार आल्यावर आम्ही मुलींसह मुलांना देखील मोफत शिक्षण देणार असं वचन दिलं आहे.

Shivsena l शिवसेना उद्धव ठाकरेंचा वचननामा :

– राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मठ, देऊळ आणि प्रेरणादायी मंदिर उभारणार असल्याचं वचन दिलं.

– शेतकऱ्यांचे नुकसान होऊ न देता तांदूळ, गहू डाळ, तेल आणि साखर या जीवनावश्यक वस्तूंचे भाव दोन वर्षे स्थिर ठेवणार असल्याचं वचन दिलं.

– महिलांना मिळणारे सरकारी अर्थसहाय्य वाढवणार असल्याचं वचन दिलं.

– प्रत्येक कुटुंबाला २५ लाखांपर्यंतची कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट उपलब्ध करून देणार.

– जात-पात-धर्म-पंथ न पाहता राज्यात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला मुक्कामांगे मोफत शिक्षण देणार असल्याचं वचन दिलं. .

– सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणार असल्याचं वचन दिलं.

– विक्रमी 50 हजार कोटींचे पॅकेज देऊन पिकाला हमीभाव देणार असल्याचं वचन दिलं.

– वंचित समूहाला सक्षम व स्वावलंबी बनवणार असल्याचं वचन दिलं.

– मुंबईतील आणि महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य देईन व अधिकचे औद्योगिक केंद्र उभारणार असल्याचं वचन दिलं..

-गिरणी कामगार संरक्षणासह मिलर्सच्या जवळच पर्यावरणासहित उद्योगाच्या साधनांना पर्यावरणासहित योग्य निर्णय घेणार असल्याचं वचन दिलं.

News Title –Shivsena thackrey group wachannama released

महत्त्वाच्या बातम्या-

संजय राऊत माविआचे xxx, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते…

मुंडे बहीण भावावर प्रवीण महाजनांच्या पत्नीचा अत्यंत गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

‘ज्यांची घरं बुलडोझरने पाडली त्यांना…’; सुप्रीम कोर्टाचा योगी सरकारला मोठा झटका

“मी आमदार झालो तर पोरांचे लग्न करुन देणार”,’या’ उमेदवाराचं अजब आश्वासन

“फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते..”; राऊत संतापले

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .