Shivsena UBT Candidate l विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाकडून उमेदवारी याद्या जाहीर केल्या जात आहेत. आतापर्यंत भाजप, शिवसेना शिंदे गट, अजित पवार गट व मनसेकडून उमेदवार जाहीर झाले आहेत. अशातच आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाने देखील एबी फॉर्मचं वाटप सुरू केलं आहे.
ठाकरेंकडून दिग्गज नेत्यांना उमेदवारी मिळणार? :
ठाकरे गटाने माहीम मतदारसंघातून शिवसेनेचा पहिला उमेदवार देखील जाहीर केला आहे. येथील मतदारसंघातून अमित ठाकरेंविरुद्ध उद्धव ठाकरेंकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटाकडून अनेक दिग्गज नेत्यांना उमेदवारी मिळणार असल्याचं दिसून येत आहे.
याशिवाय नाशिक जिल्ह्यातील नाशिक मध्य, नाशिक पश्चिम आणि मालेगाव बाह्य या विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना मातोश्रीवर एबी फॉर्म देखील देण्यात आले आहेत. तसेच आज आठ नेत्यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून या नेत्यांनी एबी फॉर्म घेतले असल्याची माहिती आहे.
Shivsena UBT Candidate l शिवसेना ठाकरे गटाकडून या नेत्यांनी एबी फॉर्म घेतले :
1. सुधाकर बडगुजर(नाशिक पश्चिम)
2. वसंत गिते(नाशिक मध्य)
3. अद्वय हिरे (मालेगाव बाह्य)
4. एकनाथ पवार (लोहा कंधार)
5. के पी पाटील, राधानगरी विधानसभा
6. बाळा माने, रत्नागिरी विधानसभा
7. अनुराधा नागवडे, श्रीगोंदा विधानसभा
8. गणेश धात्रक, नांदगाव
9. उदेश पाटेकर, मागाठाणे विधानसभा
10. अमर पाटील, सोलापूर दक्षिण
11. दीपक आबा साळुंखे पाटील, सांगोला
News Title : Shivsena UBT Candidate List
महत्वाच्या बातम्या-
शर्मिला ठाकरेंनी ओवाळणीत मागितली चक्क ‘आमदारकी’; नेमकं काय घडलं
’63 वर्षीय अभिनेत्यासोबत सेक्स सीन करताना त्यांनी मला…’; मल्लिका शेरावतकडून मोठा खुलासा
आता सुट्टी नाहीच; मनोज जरांगेंनी कोणाला केलं टार्गेट?
‘या’ मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांना भिडणार?
लवकरच Mini Fortuner कार बाजारात धुमाकूळ घालणार; जाणून घ्या किंमत?