“घोटाळेबाज भाजप”, उद्धव ठाकरेंकडून जिल्हाप्रमुखांना पुस्तक भेट!

मुंबई | देवेंद्र फडणवीस सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व जिल्हाप्रमुखांना एक पुस्तक भेट दिलंय. ‘घोटाळेबाज भाजप’ असं या पुस्तकाचं नाव आहे.

सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याने भाजप सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहे. मात्र सत्तेत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या शिवसेनेकडून मात्र भाजपला नामोहरण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

 ‘घोटाळेबाज भाजप’ या पुस्तकात भाजपच्या घोटाळ्याचे आरोप झालेल्या सर्व मंत्र्यांचे फोटो आणि त्यांच्यावर झालेले आरोप छापण्यात आलेले आहेत. त्यामुळे सेना-भाजपमधील वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.