राम मंदिराचा मुद्दा शिवसेनेनं निवडणुकीसाठीच घेतला- उद्धव ठाकरे

मुंबई |  राम मंदिराचा मुद्दा शिवसेनेनं निवडणुकीसाठीच घेतला आहे. हे मी ठासून सांगतो, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्यावरुन भाजपवर टीका केली आहे.  शिवसेना आयोजित लोकाधिकार समिती महासंघ या अधिवेशनामध्ये ते बोलत होते.

राम मंदिराच्या मुद्यावरुन भाजपला जागं करण गरजेचं आहे. प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर भाजप ‘मंदिर वही बनायेंगे’चा नारा देते, मात्र राम मंदिर अजून अस्तित्वात आलं नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

नितिश कुमार आणि रामविलास पासवान यांचा राम मंदिराला विरोध आहे. त्यांना घेऊन तुम्ही सरकार चालवता आणि काँग्रेसलाही विरोध करत राम मंदिर कसं बांधणार ते सांगा, असा सवाल त्यांनी केला आहे.

दरम्यान, राम मंदिर कसं बांधणार हे सांगितलं तर भाजपसोबतच प्रश्न मिटेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-एमएस धोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यावे- रोहित शर्मा

-“मोदींची भाषणं ऐकून मला ‘गजनी’तला आमिर खान आठवतो”

-आमच्या बहिणीने तर लहान मुलांच्या चिक्कीचे पैसे खाल्लेत- धनंजय मुंडे

-मुंबईतल्या उद्धव ठाकरेंच्या ‘घणाघाती भाषणातील’ प्रमुख मुद्दे एकाच ठिकाणी

-शिवसेनेला पटकणारा पैदा झाला नाही आणि पैदा होणारही नाही- उद्धव ठाकरे