Top News

पहिल्यांदा कोरोनावर मात, मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं…..

उल्हासनगर | शिवसेना नगरसेवक सुनील सुर्वे यांचं निधन झालं. उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सुनील सुर्वे हे उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेच्या तिकीटावर नगरसेवकपदी निवडून आले होते.

सुनील सुर्वे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी ठाण्याच्या खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं. जवळपास 23 दिवस उपचार घेतल्यानंतर कोरोनावर मात करून ते घरी आले होते.

सुनील सुर्वे यांना 15 दिवसांपूर्वी पुन्हा श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, म्हणून त्यांच्यावर घरीच उपचार करून ऑक्सिजन लावण्यात आले. मात्र दोन दिवसांपूर्वी त्रास वाढल्यानंतर सुर्वे यांना उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

दरम्यान, सुनील सुर्वे हे शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक होते. 1995 पासून ते नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

उस्मानाबादेत कोरोनाला रोखण्यासाठी मुस्लिम समाजातील दानशूर व्यक्ती करणार खर्

“सुशांतच्या अकाऊंटमधून रियाने 90 दिवसांत इतके कोटी खर्च केले”

“5 ऑगस्टला राम मंदिराचं भूमीपूजन होईल आणि मोदींच्या नेतृत्वाखाली रामराज्य येईल”

कौतुकास्पद! ज्या इयत्तेत नापास झाला पुढे त्याच इयत्तेच्या पुस्तकात छापली आनंदची यशोगाथा

पालकमंत्री एकनाथ शिंदेंवर मनसेचे गंभीर आरोप, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या