Top News विधानसभा निवडणूक 2019

मातोश्रीवर येताना आधारकार्ड अन् पाच दिवसांचे कपडे घेऊन या; उद्धव यांचे आमदारांना आदेश

मुंबई |  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी मातोश्रीवर एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व शिवसेना आमदारांना निमंत्रित केलं आहे. परंतू या बैठकीला येताना आपलं ओळखपत्र म्हणून आधारकार्ड किंवा पॅनकार्ड आणि पाच दिवसांचे कपडे घेऊन येण्याचे आदेश उद्धव यांनी आमदारांना दिल्याचं कळतंय.

नवी दिल्लीमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. बुधवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठका पार पडणार आहेत. या बैठकीत शिवसेनेसंदर्भातला अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती कळतीये. तसंच शिवसेनेने सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर राज्यपाल ओळख परेड घेऊ शकतात. त्यामुळे सेना आमदारांना ओळखपत्र घेऊन या, असं सांगितल्याची देखील माहिती आहे.

शुक्रवारी दुपारी बैठक संपल्यानंतर शिवसेना आमदारांना अज्ञातस्थळी हलविण्यात येणार असल्याची माहिती देखील कळत आहे.

भाजपशी युती तोडून देखील राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून सत्तास्थापनेला विलंब होत आहे. तसंच त्यांच्याकडून ठाम भूमिकाही जाहीर केली जात नाहीये. यामुळेच शिवसेना नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या काळजीत भर पडली आहे. त्यामुळेच या बैठकीत सद्यस्थितीचं राजकारण आणि शिवसेनेची भूमिका उद्धव ठाकरे सेना आमदारांना समजावून सांगणार आहे.

 

सर्वज्ञ आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर, माणिकबाग, पुणे

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या