पुणे | पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अरूण लाड हे विजयी झाले आहेत. यानंतर नुकतंच शिवसेनेत प्रवेश केलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी अरूण लाड यांचं अभिनंदन केलंय.
यासंदर्भात उर्मिला यांनी ट्विट केलंय. त्या म्हणतात, “पुणे पदवी मतदार संघाच्या निवडणुकीतील घवघवीत यशाकरता महाविकास आघाडीचे अरूण लाड यांचं अभिनंदन. पुढील कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा.”
विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशाकरता महाविकास आघाडीचे @NCPArunLad @satishchavan55 @AsgaonkarJayant @wanjarii यांचे अभिनंदन 👍🏻👍🏻 पुढील कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) December 4, 2020
अरूण लाड यांना या निवडणुकीत तब्बल एक लाखांपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत. लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली असून त्यांचा विजय झाला.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड, भाजपचे संग्रामसिंह देशमुख आणि मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे अशी तिरंगी लढत होती.
महत्वाच्या बातम्या-
‘मी विनोदी आहे की नाही ते जनता ठरवेल’, चंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना प्रत्युत्तर
“आम्ही एक तरी जिंकलो, पण ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा नाही”
“संयम, शिस्त दाखवली हल्लाबोल कुठे आणि कधी करायचा हे देखील आम्हाला माहीत आहे”
‘शिक्षण क्षेत्रातील खऱ्या नेतृत्त्वाला मानाचा मुजरा’; सोलापुरच्या शिक्षकाचं तुकाराम मुंढेंकडून कौतुक
14-15 डिसेंबरला मुंबईत होणार हिवाळी आधिवेशन!