बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बहुमतावर कुरघोडी कराल तर आग लागेल, हा इशारा नसून वस्तुस्थिती”

मुंबई | परमीबर सिंह यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बवरुन महाराष्ट्रातील राजकाण ढवळून निघालं आहे. सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या पत्रात अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंह यांनी केलाय.

परमीबर सिंह यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या गंभीर आरोपांनंतर विरोधकांनी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी करत ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. यावरून शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. महाविकास आघाडी सरकारजवळ आजही चांगले बहुमत आहे. बहुमतावर कुरघोडी कराल तर आग लागेल. हा इशारा नसून वस्तुस्थिती आहे, असं शिवसेनेनं अग्रेखातून म्हटलं आहे. खाद्या अधिकाऱ्यामुळे सरकारे येत नाहीत व कोसळत नाहीत, हे विरोधकांनी विसरू नये, असा टोलाही शिवसेनेनं विरोधकांना लगावला आहे.

सचिन वाझे यांना हटवून काय फायदा? पोलीस आयुक्तांना हटवा अशीच भाजपची मागणी होती. आता त्याच परमबीर सिंग यांना खांद्यावर घेऊन भाजपवाले लग्नाच्या वरातीत नाचावे तसे बेभान होऊन नाचत आहेत. हा राजकीय विरोधाभास आहे, असं शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलंय.

दरम्यान, सरकारला फक्त बदनामच करायचं असं नाही, तर सरकारला अडचणीत आणायचं असं त्यांचं धोरण आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन मोदी-शहांना भेटतात आणि दोन दिवसांत परमबीर सिंग हे असं पत्र लिहून खळबळ माजवतात. त्या पत्राचा आधार घेऊन विरोधी पक्ष जो हंगामा करत आहे हा एक कटाचाच भाग दिसतो, असा आरोप शिवसेनेनं केलाय.

थोडक्यात बातम्या- 

“आजचे हे अधिकारी अर्धी चड्डीच्या इशाऱ्यावर चाल सिंहाची दाखवतात, अन्…”

“जास्त धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुलं जन्माला का घालत नाही?”

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर जयंत पाटील म्हणाले…

‘100 कोटीच्या हिस्सेदारांची नुसती धावपळ चालली आहे’; ‘या’ भाजप नेत्याचं मोठं विधान

उठसुट राजीनामा मागणं असा उद्योग विरोधकांचा सुरु झालाय- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More