महाराष्ट्र मुंबई

“…तर तृप्ती देसाईंच्या तोंडाला काळं फासू”

शिर्डी | मंदिरातील पुजारी अर्धनग्न असतात. मग भक्तांच्या कपड्यांबाबत निर्बंध का? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी साई संस्थानला केला होता. यावर शिवसेनेकडून तृप्ती देसाईंना इशारा देण्यात आला आहे.

शिर्डीत येऊन स्टंटबाजी केल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ आणि तोंडाला काळं फासू असा इशारा शिवसेना महिला तालुका संघटक स्वाती परदेशी यांनी तृप्ती देसाईंना दिला.

दर्शन घेण्यासाठी येत असाल तर भारतीय पेहरावात यावं. तोकडे कपडे घालून मंदिरात येऊ नये, असं आवाहन साई संस्थानतर्फे करण्यात आलं होतं. यावर तृप्ती देसाईंनी आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर तृप्ती देसाईंविरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाल्या आहेत.

दरम्यान, शिवसेनेकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यावर तृप्ती देसाई काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

महत्वाच्या बातम्या-

ड्रग्ज प्रकरणी रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकला जामीन मंजूर!

व्हाईटवॉश टळला! तिसऱ्या वनडे सामन्यात भारताची ऑस्ट्रेलियावर 13 रन्सने मात

लष्करी जवान आणि माजी सैनिकांनाही प्राधान्याने कोरोनाची लस द्या- बाळा नांदगावकर

बॉलिवूड मुंबईतच राहणार, आम्ही काही घेऊन जायला आलो नाही- योगी आदित्यनाथ

मुंबईत बॉलिवूडचं वास्तव्य, सोयी-सुविधा असताना उत्तरप्रदेशात कोण जाईल?- अशोक चव्हाण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या