Top News विधानसभा निवडणूक 2019

भाजपची उलटी गिनती सुरु झाली आहे; संजय राऊतांचा इशारा

मुंबई | महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा आहे अशा मंबाजींना तो साथ देणार नाही. मंबाजीच्या राजकारणाची उलटी गिनती सुरु झाली आहे, असं म्हणत शिवसेनेनं सामना मुखपत्रातून भाजपला इशारा दिला आहे.

बाळासाहेबांच्या सातव्या सृतिदिनीच शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्यात आलं. सारा देश बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहत असताना ज्यांनी एनडीएची स्थापना केली त्यांनाच घराबाहेर काढण्याची हीन व नीच घोषणा मंडळींनी केली आहे, असं म्हणत भाजपवर टीका करण्यात आली आहे.

भाजपला याची मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. भाजपच्या अंताची सुरुवात महाराष्ट्रातून झाली आहे.  येत्या काळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकच आवाज घुमले ‘शिवसेना जिंदाबाद’ हिंमत असेल तर या अंगावर आम्ही तयार आहोत, असंही अग्रलेखात म्हणण्यात आलं आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीत यापुढे शिवसेना नसल्याचं परस्पर जाहीर करण्यात आलं आहे. प्रवासातील अतिघाई अपघाताला आमंत्रण देई ‘ तशी ही अतिघाई या मंडळींना नडल्याशिवाय राहणार नाही. नव्हे ती नडलीच आहे, अशा शब्दात शिवसेनेनं भाजपवर टीकास्त्र सोडलं.

 

 

महत्त्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या