…म्हणून शिवसेना स्वबळावर लढूच शकत नाही!

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे | शिवसेना आगामी निवडणुका स्वबळावर लढणं अशक्य आहे, असं माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. माजी खासदार संभाजीराव काकडे गौरव सोहळ्यासाठी पुण्यात आले असताना ते बोलत होते.

शिवसेनेनं स्वबळावर लढण्याची घोषणा केली असली तरी त्यांना ते शक्य नाही. कारण भाजप त्यांना सोडणार नाही. दबाव आणि सक्तीचा वापर करुन त्यांना एकत्र लढण्यास भाग पाडलं जाईल, असं चव्हाण म्हणाले.

विरोधी पक्ष एकत्र येऊ नये यासाठी भाजप प्रयत्न सुरु असतील मात्र विरोधकांनी एकत्र यायला हवं, असंही ते यावेळी म्हणाले.