नाशिक

शिवसेनेसोबत काडीमोड घेतल्यानंतर भाजप थाटणार मनसेबरोबर संसार?

नाशिक। भाजप आता मनसेसोबत युती करण्याच्या प्रयत्नात आहे. भाजप नेते आणि मनसेच्या नेत्यांची नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली आहे. नाशिकच्या मनसे कार्यालयामध्ये भाजप-मनसे यांच्यात महापौर पदाच्या निवडणुकांविषयी चर्चा झाली आहे. त्यामुळे  आता भाजप आणि मनसे असं नवं राजकीय समीकरण चर्चेत येत आहे.

नाशिक महापालिका महापौर निवडणुकीत मनसेच्या पाठिंब्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. नाशिक पालिकेच्या स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे आणि नेते शिवाजी गांगुर्डे हे भाजपचे प्रतिनिधी म्हणून मनसे कार्यालयात चर्चेसाठी गेले होते.

भाजपसाठी धोक्याची घंटा म्हणजे भाजपातून राष्ट्रवादी मार्गे शिवसेनेत गेलेले बाळासाहेब सानप हे भाजपचे पूर्व नाशिक आमदार होते. परंतु, पक्षांनं तिकीट कापल्याने त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवली पण ते पराभूत झाले.  त्यानंतर अवघ्या 8 दिवसांत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

नाशिक महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी येत्या 22 तारखेला निवडणूक होत आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन महाशिवआघाडी सरकार स्थापन करत आहे. नाशिक महापालिकेतही हाच फॉर्म्युला वापरला जाऊ शकतो. आता  मनसे कोणाची बाजू घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

 

सर्वज्ञ आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर, माणिकबाग, पुणे

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या