बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्री केलं तेव्हा नारायण राणे काय धुतल्या तांदळाचे होते का?”

हिंगोली | राज्यात शिवसेना विरूद्ध केंद्रीय मंत्री नारायण राणे असा वाद रंगलेला पाहायला मिळत आहे. दोन्हीकडून झाडल्या जाणाऱ्या आरोपांच्या फैरींमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.शिवसेना विरूद्ध राणे वादात होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांवरून शिवसेनेच्या माजी खासदाराने पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

उगाच शिळ्या कढिला उत का आणत आहात म्हणत, शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी माने यांनी पक्षाला सुनावलं आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस रिंगणाच्या बाहेरून मजा घेत असल्याचंही शिवाजी माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

राणे आता एवढ्या उशिरा खुनी दिसू लागलेत. त्यांना मुख्यमंत्रीपदी बसविले होते त्या वेळी ते काय धुतल्या तांदळासारखे होते काय? मुंबईत जी शिवसेना वाढली ज्यात मोजून काही मंडळी होती त्यात राणे होतेचं ना, असं म्हणत माने यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला दिला आहे.

दरम्यान, शिवाजी माने यांनी दोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर खासदारकी मिळवली. त्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी असा प्रवास केल्यानंतर माने पुन्हा शिवसेनेत परतले. शिवाजी माने यांची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! मोदी सरकारचा केंद्रीय कर्मचाऱ्यांना झटका

Zaira Wasim : “हिजाब ही चाॅईस नसून ही एक जबाबदारी आहे”

…म्हणून साई पल्लवीने नाकारली होती कोट्यवधींच्या जाहिरातीची ऑफर!

“जगात बापाला विसरून जाणाऱ्यांची संख्या कमी नाही”

कोरोनाचा Deltacron Varient वाढवतोय सर्वांची चिंता, अत्यंत महत्वाची माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More