शिवस्मारक पायाभरणी बोट दुर्घटना- सिद्धेश पवारच्या मृत्यूला कोण जबाबदार?

मुंबई | शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी जात असलेल्या बोटीला अपघात झाला. या अपघातात मुंबईच्या सिद्धेश पवारचा मृत्यू झाला आहे. सिद्धेश पवारच्या मृत्यूला कोण जबाबदार?, असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे. 

ज्या बोटीला अपघात झाला ती बोट विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भरलेली होती. या बोटीत क्षमतेपेक्षा जास्त माणसं भरल्याचा आरोप होतोय. 

बोट चालकाला बोट चालवण्याचा अनुभव नव्हता का? बोटचालक बोट बेदकारपणे चालवत होता. बोटीत पुरेशे लाईफ जॅकेट नव्हते, असा आरोप होतोय. 

दरम्यान, राज्य सरकारने सिद्धेशच्या कुटुंबियांसाठी 5 लाख रुपयांची घोषणा केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-पैसे नसताना सरकार अशा योजना काढतं आणि लोकांचा जीव घेतं- राज ठाकरे

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर पुन्हा भरकटलं

-Diwali शब्दात ‘Ali’ शब्द येतो म्हणून योगी सरकार दिवाळीचं नाव बदलणार!

-तनुश्री दत्तानं माझ्यावर बलात्कार केला; राखीचा गंभीर आरोप

-उद्धवजी… ते राजीनामे आता फाटले असतील, ते एकदा देऊन बघा-सुप्रिया सुळे

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या