शिवस्मारकाची उंची कमी करण्याचा सरकारचा घाट?

मुंबई | शिवस्मारकाची उंची कमी करण्याचा सरकारचा घाट असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावलाय. 

स्मारकाची उंची 192 मीटरवरुन 210 मीटर करण्यात आली. मात्र उंची वाढवण्याच्या नावाखाली सरकारने प्रत्यक्षात पुतळ्याची उंची कमी करुन पुतळ्याखालच्या चौथऱ्याची उंची वाढवली असल्याचा दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

शिवस्मारक हा महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या स्वाभिमानाचा विषय आहे. 210 मीटरचा पुतळा तयार करण्याचा निर्णय झाला आणि तो त्याच उंचीचा राहील, अशी ग्वाही सुधीर मुनगंटीवार यांमी दिली.