शिवस्मारकाचं काय झालं? भाजपविरोधात सोशल मीडियात संताप

मुंबई | शिवस्मारकाचं जलपूजन होऊन एक वर्ष लोटलं तरी अद्याप वीट रचणं सोडा, सरकारला साधी निविदा प्रक्रियाही पूर्ण करता आलेली नाही, त्यामुळे सोशल मीडियात भाजप सरकारविरोधात मोठा संताप पहायला मिळतोय. 

24 डिसेंबर 2016 रोजी मुंबई महापालिका निवडणुकींच्या पूर्वी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्मारकाचं जलपूजन केलं होतं. मोठी जाहिरातबाजी आणि खर्च यासाठी करण्यात आला होता. 

दरम्यान, सरकारनं मागवलेल्या निविदांमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त रकमेच्या निविदा आल्याचं कळतंय. एल अॅन्ड टी कंपनीसोबत सध्या सरकारची बोलणी सुरु आहेत. ही बोलणी फिस्कटली तर सरकारने नव्याने निविदा काढणार असल्याचं कळतंय. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या