अपघातानंतर पुन्हा एकदा शिवस्मारकाच्या भूमीपूजनासाठी घाई

मुंबई |  दोन महिन्यांपूर्वीच शिवस्मारकाच्या भूमीपूजन कार्यक्रमावेळी अपघात झाला होता. आता पुन्हा एकदा अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या भूमीपूजनासाठी घाई केली जात आहे, अशी माहिती पुढे येत आहे.

20 डिसेंबरचा मुहूर्त शोधत, शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात येणार आहे. मात्र इतक्या कमी कालावधीत भूमीपूजनच्या कार्यक्रमाची तयारी कशी पूर्ण होणार? असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे.

विशेष म्हणजे हा कार्यक्रम 4 डिसेंबरलाच होणार होता. त्यासाठी विनायक मेटेंनी अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या होत्या. 

दरम्यान, 24 ऑक्टोबर रोजी शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी जाणाऱ्या एका बोटीचा अपघात झाला होता. त्यावेळी एका तरूणाचा अपघातात मृत्यू झाला होता.

महत्वाच्या बातम्या-

-भाजपला आणखी एक धक्का बसणार??? विनायक मेटे युतीतून बाहेर पडण्याची शक्यता

-आता राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार; पाहा कुणी केली ही घोषणा…

-राहुल गांधींनी ‘पप्पू’ नाही तर आता ‘पप्पा’ होण्याची गरज – रामदास आठवले

-ज्यांनी मला अटक केली त्यांनाच माझ्या अटकेचं कारण माहित नाही! – छगन भुजबळ

-मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका मागे घ्या- संभाजीराजे छत्रपती