बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रत्येक महाविद्यालयात साजरा होणार शिवस्वराज्य दिन; मंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

पुणे | महाराष्ट्रातील प्रत्येक महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा केला जाणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज केली आहे. दरम्यान, पुढच्या वर्षीपासून शिवज्योत रॅली देखील प्रत्येक महाविद्यालयातून निघणार आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या पुण्यातील सीओईपी या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून याचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

कोरोना नियमांचे पालन करुन उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून शिवस्वराज्य दिन साजरा केला जाणार असल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच पुढच्या वर्षीपासून प्रत्येक महाविद्यालयातून शिवज्योत रॅली काढली जाणार, असं देखील या माध्यमातून त्यांनी जाहीर केलं आहे.

उदय सामंत यांनी केलेल्या घोषणेमुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक महाविद्यालयात आता शिवस्वराज्य दिन साजरा केला जाणार आहे.

थोडक्यात बातम्या –

‘ही’ असू शकते भारतातील सर्वात स्वस्त लस, जाणून घ्या किंमत!

“संघाला कोरोनापेक्षा नरेंद्र मोदींच्या ढासळत्या लोकप्रियतेची चिंता”

टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यासाठी ‘हा’ देश आला पुढे; बीसीसीआय पुढे नवं आव्हान

राष्ट्राध्यक्षांचं ट्वीट डिलीट करणं ट्विटरला पडलं महागात; झाली ‘ही’ कारवाई

धक्कादायक! कोरोनामुळं आई-वडिलांचं छत्र हरपल्यानं तीन मुलं झाली अनाथ

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More