बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी जनरल डायरसारखा प्रचार करत पार्थ पवारला पराभूत केलं”

पुणे | मावळ लोकसभा निवडणुकीत मी खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी जनरल डायरसारखा लढून पार्थ पवारचा पराभव केला, असं वक्तव्य शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केलं आहे. पुण्याच्या वडगावशेरीमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांना मेळाव्यात शिवतारे बोलत होते.

मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यासाठी मी जनरल डायरसारखा प्रचार करत पार्थ पवारला पराभूत केलं. मात्र, मी पुरंदरमधून विधानसभेला उभा राहिल्यावर माझ्यामागे कोणीही राहिलं नाही, अशी खंत शिवतारेंनी व्यक्त केली आहे. आज पुण्यात संजय राऊत यांच्या उपस्थितीत महानगरपालिका निवडणूक पूर्व आढावा मेळावा पार पडला.

सर्व सामान्य नागरिकांना जिल्हा बँकेत स्थान मिळत नाही. मी पार्थ पवार विरोधात प्रचार केला. मला खुलं आव्हान देऊन पाडलं असलं तर मी मनपा निवडणुकीत सर्व प्रयत्न करत, एकहाती सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच पुरंदरची खुमखुमी मी पालिकेत दाखवणार म्हणत शिवतारेंनी थेट अजित पवारांना इशारा दिला आहे.

दरम्यान, आज आगामी महानगरपालिकेच्या धर्तीवर पुण्याच्या पिंपरी चिंचवडसह वडगावशेरी येथे शिवसेनेचे पदाधिकारी मेळावे पार पडले. या मेळाव्यासाठी शिवसेनेचे नेते संजय राऊत, निलम गोऱ्हे, शिवाजीराव आढळराव पाटील, विजय शिवतारे यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या –

“आमचं ठरलंय! महाविकास आघाडी सरकारची रिक्षा पंक्चर करायची”

” मी माफी मागणार नाही, ऑडिओ क्लिपमधील तो आवाज माझा नाहीच”

“शिवसेनेने आम्हाला धोका दिला, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा DNA वेगळाच”

“प्रभू श्रीराम संपूर्ण जगाचे, ते फक्त भाजप आणि आरएसएसचे नाहीत”

‘मोदींजीना बोलवा, तरच मी लस घेईल’; पठ्ठ्याच्या मागणीनं अधिकाऱ्यांना फुटला घाम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More