खेळ

“भारत-पाकिस्तान एकमेकांचे कांदे, बटाटे खाऊ शकतात मग क्रिकेट सामना खेळायला नकार का?”

Loading...

मुंबई | आम्ही एकमेकांचे कांदे, बटाटे, टॉमेटो खाऊ शकतो. मग भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये द्विदेशीय क्रिकेट मालिका का होऊ शकत नाही, असा सवाल पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि रावळपिंड एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरने केला आहे.

भारताला पाकिस्तानबरोबर क्रिकेटची द्विदेशीय मालिका खेळायची नसेल तर मग कबड्डी आणि टेनिसदेखील खेळू नये. त्याचबरोबर भारतीयांनी पाकिस्तानबरोबर व्यापारही करू नये, असं माझं स्पष्ट मत असल्याचं शोएब अख्तरनं म्हटलं आहे.

भारत आणि पाकिस्तान दुबईमध्ये आशिया चषक खेळू शकतात. तर मग त्रयस्थ ठिकाणी क्रिकेटची मालिका खेळत का नाहीत. जर भारताला पाकिस्तानमध्ये येऊन सामने खेळायचे नसतील तर आम्हीदेखील त्यांच्या देशात जाणार नसल्याचं अख्तरनं यावेळी बोलताना सांगितलं आहे.

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये आता मालिका होणे अशक्यच असल्याच बोललं जात आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

माफी मागितली तरी इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल व्हायला हवा- तृप्ती देसाई

अहो फडणवीस, राज्याची काय पूर्ण देशाची निवडणूक परत घ्या; पवारांचं फडणवीसांना आव्हान

महत्वाच्या बातम्या-

अखेर इंदोरीकर महाराजांची माघार; व्यक्त केली दिलगिरी!

महाराष्ट्राच्या संतपरंपरेत इंदोरीकरांचं कीर्तन बसत नाही- सदानंद मोरे

भाजप कार्यकर्ते आहत का? सगळे बीळात शिरले- नवाब मलिक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या