मॅन्चेस्टर | रविवारी भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला क्रिकेटच्या रणांगणात लोळवून धुव्वा उडवण्याचा विक्रम कायम ठेवला. मात्र हा पराभव पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याच्या चांगलाच जिव्हारी लागलाय.
शोएब अख्तर याने आपल्या युट्युब चॅनेलवरून भारत पाक सामन्यावर भाष्य केलं आहे. आमची मॅनेजमेंट पागल आहे आणि आमचा कॅप्टन वेडा आहे. तो मामू बनला आहे. त्याला काही कळत नाही. तो 10 वीच्या वर्गातला मुलगा आहे, अशी टीका त्याने सर्फराज खान याच्यावर केली आहे.
एवढ्या वर्षात कधी धावांचा पाठलाग करता आला नाही. त्यामुळे आमच्या कर्णधाराने जरासं डोकं चालवायला पाहिजे होतं. सर्फराज खानला आमचे मॅनेजनेंट जेवढं सांगतं तेवढंच तो सामन्यात करतो, असं शोएब अख्तर म्हणाला.
दरम्यान, मँचेस्टरमध्ये झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव केला आहे.
महत्वाच्या बातम्या
-शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या तर ते पाप फडणवीस सरकारचं- अजित पवार
-मनसेची राधाकृष्ण विखेंवर बोचरी टीका; ‘स्वार्थही ओशाळला असेल’…
-मंदिरात चोरी केल्याच्या संशयावरुन चिमुकल्याला गरम टाईल्सवर बसवलं
-पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकूनही भारतीय संघाचं टेंशन वाढलं
-रोहित शर्मानं आपल्या धडाकेबाज शतकाचं श्रेय दिलं समायराला!
Comments are closed.