बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बाप बाप होता है’ वगैरे घडलंच नाही, विरेंद्र सेहवाग खोटारडा आहे- शोएब अख्तर

मुंबई | क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याच्या स्तुतीमध्ये भारताचा फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने सांगितलेला ‘बाप बाप होता है, बेटा बेटा होता है’ असा किस्सा खोटा असल्याचा दावा ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ नावाने प्रसिद्ध पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरने केला आहे.

शोएब अख्तरने क्रीडा पत्रकार विमल कुमार यांच्याशी बातचित केली. यावेळी अख्तरला सचिन-सेहवागच्या ‘बाप बाप होता है, बेटा बेटा होता है’ या किस्स्याबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा असं काही झालंच नव्हतं, हे सर्व खोटे आहे, असा दावा अख्तरने केलाय.

मी सेहवागची गचांडी पकडून विचारलं, तू टीव्हीवर ही गोष्ट सांगितली आहेस का, तर तो पलटला. गौतम गंभीरला विचारा. मी त्याला बोललो जर मी पाहिलं की तू टीव्हीवर हे सांगितलं आहेस, तर मी तुला सोडणार नाही. मी गरम डोक्याचा माणूस आहे. मैदानावर जर असं काही झालं असते, तर मी सेहवागला सोडले नसतं, असं अख्तरने सांगितलं.

दरम्यान, 2003 च्या विश्वचषकात मुलतानमधील मैदानावर घडलेला किस्सा लोकप्रिय आहे. या सामन्यात शोएब अख्तरने आपल्याला डिवचण्याचा प्रयत्न केल्यानंतर मी त्याला बाप बाप होता है, बेटा बेटा होता है असं म्हटल्याचं विरेंद्र सेहवागने अनेक सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

नको ते करायला गेली; पूनम पांडेला पोलिसांनी केली अटक

‘माघारी’पेक्षा महाराष्ट्राचे हित महत्त्वाचं होतं, काँग्रेसच्या भूमिकेचं सामनामधून कौतुक

महत्वाच्या बातम्या-

भाजपला सोडचिठ्ठी देणार का?, एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा

मुख्यमंत्र्यांकडून विधानपरिषदेचा अर्ज दाखल; ठाकरे कुटुंब विधान भवनात उपस्थित

काँग्रेसने सचिन सावंत यांना उमेदवारी द्यायला हवी होती- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More