बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतीय संघाला रोखण्यासाठी शोएब अख्तरने पाकिस्तानी संघाला दिले भन्नाट सल्ले, धोनीला रोखा…

मुंबई | भारताचा पाकिस्तानविरूद्धचा टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना रविवारी दुबईमध्ये होत आहे. हा हायहोल्टेज सामना पाहण्यासाठी क्रिक्रेटप्रेमींना मोठी आतुरता लागून राहिली आहे. रविवारी सायंकाळी 7:30  वाजता भारत-पाकिस्तान सामना पाहायला मिळणार आहे. त्यातच आता पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने भारतीय संघावर विजय मिळवण्यासाठी काही सल्ले आहेत.

शोएब अख्तरने पाकिस्तानी संघाला काही भन्नाट सल्ले दिले आहेत. हे सल्ले ऐकल्यानंतर तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. भारतीय संघ मजबुत आहे. त्यामुळे पाकिस्तान संघाने भारतीय संघाला झोपेची गोळी द्यावी, असा सल्ला शोएब अख्तर याने दिला आहे. मेंटॉर असलेला महेंद्रसिंग धोनी फलंदाजीकरिता येणार नाही, याची काळजी घ्या. महेंद्रसिंग धोनीला फलंदाजी करण्यापासून पाकिस्तान संघाने थांबवलं पाहिजे. कारण की, माझ्यावर विश्वास ठेवा, महेंद्रसिंग धोनी अजुनही फॉर्ममध्ये असलेला खेळाडू आहे, असं शोएब अख्तरने पाकिस्तानी संघाला उद्देशुन म्हटलं आहे.

यावेळी शोएब अख्तरने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचं देखील नाव घेतलं आहे. विराट कोहली खुप लोकप्रिय आहे. विराट कोहलीला इंस्टाग्राम वापरण्यापासून थांबवा, तो खुप लोकप्रिय आहे, असाही सल्ला शोएब अख्तरने पाकिस्तान संघाला दिला आहे.

दरम्यान, भारत पाकिस्तान हायहोल्टेज सामना दुबईतील इंटरनॅशनल स्टेडीयमवर खेळवला जाणार आहे. रविवारी या सामन्यात सलामीकरिता रोहित शर्मा आणि केएल राहुल येणार आहेत. मधल्या फळीमध्ये विराट कोहली, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दीक पांड्या अनुक्रमे खेळणार असल्याची माहिती आहे.

थोडक्यात बातम्या- 

“मी तर आधीपासून सांगत आहे, राज्य सरकारनं आता तरी…”; नवाब मलिकांनी केली महत्वाची मागणी

‘या’ समस्यांना मुळासकट उखडून फेकावं लागेल; उस्मानाबादमधील ‘त्या’ घटनेवरून चाकणकर कडाडल्या

उस्मानाबादच्या डान्स बारवरून अमोल मिटकरी आक्रमक, म्हणाले…

टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराटचा पाकविरूद्ध जबरदस्त विक्रम! आजच्या सामन्यात मोठा धमाका करणार

भारत पाकिस्तान सामन्यापुर्वी शाहिद आफ्रिदीच्या मनात चलबिचल, म्हणाला… 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More